मुंबई

...तर देशव्यापी लॉंग मार्च काढू! ओला, उबेर आदी कंपन्यांविरोधात वाहन चालक-मालकांचा संताप

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मुंबई महानगर प्रदेशात सुमारे 40 हजार ऍपबेस्ड ओला-उबर चालक-मालक असून त्यांच्या दैनंदिन समस्यांचा लढा अद्याप संपलेला नाही. यासंदर्भात लवकरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन त्यांच्या समस्या मार्गी लावणार आहे; मात्र अन्य राज्यांमधील ओला-उबरसंबंधित विविध समस्यांबाबत केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाला निवेदन दिल्यानंतरही त्याची दखल घेतली जात नसेल, तर देशव्यापी लॉंग मार्च काढावा लागेल, असा इशारा कामगार नेते सचिन अहिर यांनी दिला आहे. 

देशातील सुमारे 11 राज्यांतील ऍपबेस्ड ओला-उबर चालक-मालक संघटनांनी एकत्र येऊन इंडियन फेडरेशन ऑफ ऍपबेस्ड ट्रान्सपोर्ट वर्कर्स या नवीन संघटनेची स्थापना केली असून या संघटनेच्या मुंबईत आयोजित पहिल्या दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे उद्‌घाटन केल्यानंतर ते बोलत होते. या परिषदेच्या कार्यक्रमातच सचिन अहिर यांनी संघटनेची घोषणादेखील केली.

मुंबईसह देशाच्या अनेक प्रांतामध्ये ऍपबेस्ड ओला, उबर, स्वीगीसह अनेक खासगी वाहन सेवा सुरू आहेत. या कंपन्यांकडून चालक, मालकांचे शोषण सुरू असल्याने अशा प्रश्‍नांवर आता राष्ट्रीय स्तरावर आवाज बुलंद करण्याची गरज असल्याचे अहिर यांनी सांगितले. परिषदेच्या पहिल्या सत्राच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवसंग्राम संघटनेचे प्रमुख उदय आंबोळकर होते. या वेळी एचएमएसचे राजा श्रीधर, इंटकचे जगदीश राज, आंतरराष्ट्रीय संघटनेचे बिजू मॅथ्यू, संगम त्रिपाठी, निवृत्ती देसाई, सुनील बोरकर, प्रशांत सावडावकर, राजेंद्र गिरी, काशिनाथ माटल आदी मान्यवर उपस्थित होते. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Thalapathy : 'बीअरसाठी १० रुपये जास्त घेतले'; मुख्यमंत्री विजय थलपतींना थेट तक्रार, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

Revenue Officers Arrest : बनावट मृत्यू प्रमाणपत्र अन् वंशावळ! मठाची 100 कोटींची जमीन हडपण्याचा डाव; 6 महसूल अधिकाऱ्यांसह 11 जणांना बेड्या

Latest Marathi News Update : कोस्टल रोडच्या बोगद्यात अनेक गाड्यांची धडक, एक गाडी पेटली

Ad Free Videos : आता Youtube वर येणार नाही जाहिरात! बघा नॉनस्टॉप व्हिडिओ; फ्रीमध्ये वापरा 'हे' फीचर, पाहा एका क्लिकवर

Jayant Patil : राज्याचा अर्थमंत्री कोण होणार ? जयंत पाटलांनी स्पष्टच सांगितलं, मुख्यमंत्र्यांच्या भेटीचा केला खुलासा

SCROLL FOR NEXT