File Photo 
मुंबई

महालक्ष्मी येथे लवकरच पशुवैद्यकीय रुग्णालय

सकाळ वृत्तसेवा

मुंबई ः महापालिका महालक्ष्मी येथे पशुवैद्यकीय रुग्णालय सुरू करणार आहे. टाटा समूहातर्फे बांधल्या जाणाऱ्या या रुग्णालयाला शनिवारी (ता. २१) सुधार समितीने मंजुरी दिली. महालक्ष्मी येथे ऑर्थर रोड तुरुंगामागे सुमारे ३६९१.४० चौरस मीटर भूखंडावर महापालिकेचे श्‍वान नियंत्रण कार्यालय आहे. तेथे वेल्फेअर ऑफ स्ट्रे डॉग्ज या खासगी संस्थेचे प्राणी प्रजनन नियंत्रण केंद्रही कार्यरत आहे.

या भूखंडासहित ३९४६ चौरस मीटर क्षेत्रावर ३०० ते ४०० प्राण्यांची क्षमता असलेले अद्ययावत पशुवैद्यकीय रुग्णालय बांधण्यात येत आहे. ‘बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा’ तत्त्वावर बांधण्यात येणाऱ्या या रुग्णालयासाठी सर दोराबजी टाटा ट्रस्टने पुढाकार घेतला आहे. महापालिकेच्या जागेवर टाटा पशुवैद्यकीय रुग्णालयाची इमारत उभी राहणार आहे. ही जागा ३० वर्षांच्या कराराने टाटा समूहाला देण्यात आली असून, रुग्णालयाची मालकी महापालिकेकडेच राहील. त्यासाठी आवश्‍यक यंत्रणा टाटा समूह खरेदी करणार आहे. महापालिकेच्या दरांनी प्राण्यांवर उपचार करण्याची अट सामंजस्य करारात असेल असे सांगण्यात आले.

मुंबई महापालिकेकडे भटक्‍या आणि  मोकाट जनावरांच्या उपचारासाठी योग्य व्यवस्था नाही. आता टाटा समूहातर्फे बांधल्या जाणाऱ्या रुग्णालयात गरीब नागरिकांनाही पाळीव प्राण्यांवर नाममात्र दरांत उपचार करून घेणे शक्‍य होईल. त्याचप्रमाणे जखमी, आजारी आणि भटक्‍या जनावरांवर मोफत उपचार करण्यात येणार आहेत.

मास्टर लिस्टमधील रहिवाशांची संपूर्ण यादी प्रसिद्ध केली जाणार असून, त्याबाबत हरकती मागवल्या जाणार आहेत. त्याचप्रमाणे मास्टर लिस्टमधील प्रत्येक रहिवाशाला घर मिळावे, या दृष्टीने कार्यवाही केली जाईल.
- मिलिंद म्हैसकर
, उपाध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी, म्हाडा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PF News: EPF धारकांसाठी 9 मोठे बदल! PF व्याज ते 5 लाखांपर्यंत ऑटो क्लेम नेमकं काय-काय बदललं? मंत्र्यांचे स्पष्टीकरण

Vijay Thalapathy : 'बीअरसाठी १० रुपये जास्त घेतले'; मुख्यमंत्री विजय थलपतींना थेट तक्रार, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

Latest Marathi News Update : कोस्टल रोडच्या बोगद्यात अनेक गाड्यांची धडक, एक गाडी पेटली

Revenue Officers Arrest : बनावट मृत्यू प्रमाणपत्र अन् वंशावळ! मठाची 100 कोटींची जमीन हडपण्याचा डाव; 6 महसूल अधिकाऱ्यांसह 11 जणांना बेड्या

Ad Free Videos : आता Youtube वर येणार नाही जाहिरात! बघा नॉनस्टॉप व्हिडिओ; फ्रीमध्ये वापरा 'हे' फीचर, पाहा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT