Crime news sakal
मुंबई

सात वर्षाची मुलगी भाजली; उकळते तेल फेकल्याचा विक्रेत्यावर आरोप

रागातून उकळते तेल फेकल्याचा आरोप विक्रेत्यावर करण्यात आलाय.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : पुरी भाजी विक्रेत्यासोबत एका ग्राहकाला भांडण करणे चांगलेच महागात पडले. त्यांच्या या भांडणात सात वर्षांची मुलगी आणि वृद्ध व्यक्तीवर उकळते तेल फेकले गेले. यात सात हे दोघेही भाजले आहेत. मुंबईतील कुर्ला भागात (Kurla Mumbai) कसाई वाडीत ही घटना आहे. धक्कादायक म्हणजे रागातून उकळते तेल फेकल्याचा आरोप विक्रेत्यावर करण्यात आलाय. (Victims family accused on Puri bhaaji sellers that he throw boiling oil on old man and girl intentionally)

पुरी भाजी विकणाऱ्या व्यक्तीचे वृद्धासोबत भांडण झाले. या दरम्यान सात वर्षांची मुलगी आणि वृद्ध व्यक्तीवर उकळते तेल फेकले गेले. सात वर्षांची चिमुकली आणि वृद्ध व्यक्ती या घटनेत भाजले तर सात वर्षीय लहान मुलीला सायन रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. भांडणाच्या रागातून ग्राहकावर विक्रेत्याने उकळते तेल फेकल्याचा आरोप करण्यात आलाय.

या प्रकरणी चुनाभट्टी पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला तर पोलिसांनी गांभीर्याने दखल न घेतल्याचाही आरोप पीडित कुटुंबाने केला आहे. दोघांवर उकळते तेल फेकणारा पुरी भाजी विक्रेता खुलेआम फिरत असल्याचाही दावा पीडित कुटुंब करत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Student Visa Update: भारतीय विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! डोनाल्ड ट्रम्प यांच्या चार वर्षांच्या व्हिसा नियमांना स्थगिती

Pakistan Cricket : पाकिस्तानात शाहिद आफ्रिदीच्या नावावरून पसरलीय अफवा; नेमकं काय घडलं?

कोकणात मध्यरात्री बाप्पाची ‘चोरी’ होते? दारात गणपती ठेवून फटाके फोडण्यामागचं कारण ऐकून व्हाल भावूक!

श्रीविद्या अन् सीमंतमच्या विधी! सामंथाला ओटीभरणीत चाळणीने अंघोळ का घातली? काय आहे परंपरा? Video

Markandeya Parvat Yatra Ban : मार्कंडेय गडावर ऋषीपंचमी यात्रेला यंदाही 'ब्रेक'; भाविकांना केवळ पहिल्या पायरीपर्यंतच प्रवेश, प्रशासनाचा निष्काळजीपणा?

SCROLL FOR NEXT