मुंबई

विद्यार्थी पालक समन्वय समितीने घेतली राज ठाकरेंची भेट; अकरावी प्रवेशाचा तीढा सोडवण्याची मागणी

तुषार सोनवणे

मुंबई - विद्यार्थी पालक समन्वय समितीने आज मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतली आहे. मुंबईतील कृष्णकुंज या निवासस्थानी त्यांनी भेट घेतली. गेल्या अनेक महिण्यांपासून अकरावीच्या प्रवेशाचा तीढा सूटलेला नाही. तसेच खासगी कोंचिंग क्लासेसच्या शिक्षकांचा प्रश्नही ऐरणीवर आहे. त्यामुळे या समितीने राज ठाकरेंची भेट घेतल्याचे समजते.

मराठा आरक्षणाला दोन महिण्यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली. तेव्हापासून राज्यातील लाखो अकरावीच्या विद्यार्थ्यांचे प्रवेश रखडले आहेत. हा मुद्दा लवकरात लवकर कसा मार्गी लावता येईल या मागणीसाठी विद्यार्थी पालक समन्वय समितीने राज ठाकरे यांच्या कृष्णकुंजवर धाव घेतली आहे. नेमके यातून मार्ग काय काढावा यासाठी सरकारला जागं करावं म्हणून राज ठाकरेंना समितीने साद घातली आहे. राज्यातील काही विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले आहेत. अनेकांचे ते झालेले नाहीत. ही प्रक्रिया मराठा आरक्षश्रणामुळे अडकले आहेत. राज्यातील रखडलेल्या प्रवेश प्रक्रियेसोबतच महाविद्यालयांना केलेल्या भरमसाठ फीवाढीमुळे पालक हैराण झाले आहेत.

यासोबतच राज्यातील खासगी कोंचिंग क्लासेसच्या मालक आणि शिक्षकांनीही राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. गेल्या अनेक महिण्यांपासून खासगी कोचिंग बंद असल्याने शिक्षकांचे आतोनात हाल होत आहेत. त्यांच्यावर उपासमारीची वेळ आहे. राज्यातील खासगी कोचिंग क्लासेस लवकरात लवकर सुरू करावेत या मागणीसाठी त्यांचेही शिष्टमंडळ राज ठाकरेंच्या भेटीला आले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate: सोने आणि चांदीच्या ईटीएफमध्ये मोठी घसरण! खरेदी करण्याची ही योग्य वेळ आहे का? जाणून घ्या तज्ञांचं मत...

५ तास, २७ मिनिटे...! कार्लोस अल्काराझने इतिहास घडवला, रोमहर्षक लढतीनंतर Australian Open च्या फायनलमध्ये एन्ट्री

Latest Marathi News Live Update : सुनील तटकरे यांची थोड्याच वेळात पत्रकार परिषद

अखेर 'कमळी'ची खरी ओळख समजणार; अन्नपूर्णा आजीची नात म्हणून दणक्यात एंट्री घेणार; 'या' दिवशी होणार महाखुलासा

NCP Ajit Pawar Sharad Pawar : दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? राजेश टोपेंनी दोन वाक्यात विषय संपवला, Video

SCROLL FOR NEXT