भिवंडी : गोदामांवर सुरू असलेली कारवाई  
मुंबई

भिवंडीतील ग्रामस्थांची मुख्यमंत्री, पालकमंत्र्यांकडे धाव 

सकाळ वृत्तसेवा

भिवंडी : मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार एमएमआरडीए प्रशासनाच्या विशेष अतिक्रमण पथकाने ठाणे जिल्हाधिकारी डॉ. राजेश नार्वेकर यांच्या नेतृत्वाखाली भिवंडी तालुक्‍यातील विविध ग्रामपंचायत कार्यक्षेत्रांतील बेकायदा बांधकामे, गोदामांवर कारवाई सुरू केली आहे. त्यामुळे ग्रामस्थांसह व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण आहे. ही कारवाई अन्यायकारक असून ती थांबवण्यासाठी ग्रामस्थांनी थेट राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे धाव घेऊन सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. 

दरम्यान, तालुक्‍यातील ओवळी ग्रामपंचायत हद्दीतील पारसनाथ कम्पाऊंडमधील बेकायदा गोदामांवर गुरुवारी (ता. 23) दोन जेसीबी मशीनच्या साह्याने निष्कासन कारवाई करण्यात आली. या कारवाईला ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात विरोध केला. बंदोबस्तावरील पोलिसांनी हस्तक्षेप करून सर्वांना शांत करत कारवाई केली. 

मुंबई उच्च न्यायालयाने भिवंडी तालुक्‍यातील बहुतांश इमारती, घरे व गोदामे आदी बांधकामे बेकायदा ठरवली आहेत. या बांधकामांचे सर्व्हेक्षण करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली महसूल विभाग व एमएमआरडीए अधिकारी यांची समिती नियुक्त केली आहे. या बांधकामांवर 15 फेब्रुवारीपर्यंत कारवाई करून अहवाल सादर करण्याचे आदेश न्यायालयाने जिल्हा अधिकारी डॉ. राजेश नार्वेकर यांना दिले आहेत. त्यानुसार गेल्या महिनाभरापासून महसूल, पालिका व एमएमआरडीए प्रशासनाने तोडकाम कारवाई हाती घेतली आहे. 

तालुक्‍यातील ओवळी ग्रामपंचायतीच्या हद्दीतील स. नं. 35 या जमिनीवर स्थानिक शेतकऱ्यांनी विकासकांशी करार करून भागीदारीत 24 गोदामांचे बांधकाम केले आहे; मात्र बांधकाम करताना सरकारी परवानगी घेतली नाही, असा ठपका ठेवून बांधकामे तोडण्यात आली. या तोडकामामुळे स्थानिक शेतकऱ्यांवर रोजी-रोटी गमावण्याची वेळ आल्याची प्रतिक्रिया नगरसेवक नीलेश चौधरी यांनी दिली.

सदर बाधकामास ग्रामपंचायतीची परवानगी आहे. त्यामुळे याप्रकरणी सरकारने लक्ष द्यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. शिवसेना आमदार शांताराम मोरे, भाजप आमदार महेश चौघुले यांचे शिष्टमंडळ लवकरच ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांसह राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व पालकमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

National Herald case : 'नॅशनल हेरॉल्ड' प्रकरणी राहुल अन् सोनिया गांधींच्या अडचणीत वाढ होणार?; 'ED'ने टाकलं मोठं पाऊल!

Kolhapur Gazette: मराठा आरक्षणासाठी सर्वात मोठा पुरावा! कोल्हापूर गॅझेटमध्ये कुणबी अन् मराठ्यांची 'अशी' नोंद

Nepal Protest: नेपाळ हिंसाचारामागील खरा सूत्रधार कोण? प्रसिद्ध रॅपर आणि राजकीय नेत्याचं नाव समोर, हा नेमका आहे तरी कोण?

MS Dhoni करतोय बॉलीवूड पदार्पण? माधवनसोबतचा जबरदस्त ऍक्शन पॅक टीझर आला समोर

Latest Marathi News Updates : कुणबी प्रमाणपत्रात कुणावरही अन्याय होणार नाही- एकनाथ शिंदे

SCROLL FOR NEXT