वासिंद : प्रकाशन सोहळ्याला उपस्थित मान्यवर.  
मुंबई

शास्त्रावर शस्त्र चालवणे म्हणजे हिंसा ः बागवे

सकाळ वृत्तसेवा

 वासिंद ः शस्त्राला शस्त्राने मारणे आणि शास्त्राला शास्त्राने मारणे ही हिंसा नव्हे; मात्र "शास्त्रावर शस्त्र चालवणे' ही हिंसा असून सध्या सगळीकडे असेच वातावरण आहे, अशी खंत व्यक्त करून कविता आणि कवी यातून मार्ग काढून सुखाची मैफिल सजवेल, असा आशावाद ज्येष्ठ कवी अशोक बागवे यांनी काढले. वासिंद येथे कवयित्री शीला जोशी यांच्या "सुखाची मैफिल' कविता संग्रहाचे प्रकाशन कवी बागवे यांच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते.

विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष विठ्ठल भेरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला सचिव सुरेश रोठे, पत्रकार कैलास म्हापदी, माजी आमदार दिगंबर विशे, प्रभाकर जोशी उपस्थित होते. कवी बागवे पुढे म्हणाले की, कविता शोकाचे श्‍लोकात रूपांतर करते, दुसऱ्याचे मन समजून घेणे म्हणजे कविता. दुसऱ्याच्या वेदनेची कवितेने सहवेदना होते आणि कविता ही जीवनभर विविध टप्प्यांवर आपली साथ करते. माणसांच्या मनाचा विचार न करणाऱ्या सध्याच्या काळात कविता आणि कवीचे अनन्यसाधारण महत्त्व विविध दृष्टान्तांनी पटवून देत त्यांनी श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. 

पाठ्यपुस्तकात दर्जेदार साहित्याची गळचेपी करून उपयोजित साहित्याला अवाजवी महत्त्व देण्याच्या धोरणाबद्दल बागवे यांनी टीका केली. या वेळी कैलास म्हापदी व विठ्ठल भेरे यांनी मनोगत व्यक्त करून जोशी यांच्या कवितांचे महत्त्व विशद केले. कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्ते अशोक इरणक, अनिल मानिवडे, संदीप पाटील, मोहन जाधव, रंगनाथ काठोळे, विद्याधर जाधव, एकनाथ दांडकर, कवी भाऊ विशे यांच्यासह मोठ्या संख्येने रसिक उपस्थित होते. शैलेश जोशी यांनी स्वागत; तर संजीव जाधव व मुकेश दामोदरे यांनी सूत्रसंचालन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganeshotsav Ayurvedic Prasad: गणेशोत्सवातील प्रसादातून मज्जाधातूचे पोषण; आयुर्वेदानुसार मोदक, पंचामृत, लाडू व लाह्यांचे मेंदूवर्धक गुण

आजचे राशिभविष्य - 11 सप्टेंबर 2026

Haritalika Ritual: हरितालिका व्रताचा खरा अर्थ काय? पार्वतीच्या तपश्चर्येपासून विवाहातील प्रेम, निवड, संयम आणि नात्यांच्या संतुलनापर्यंत

Ayurvedic Treatment: ३५व्या वर्षी हाडे ठिसूळ होऊन वारंवार फ्रॅक्चर का? आयुर्वेदातून काय मदत मिळू शकते; आहार, अभ्यंग आणि उपचाराबाबत जाणून घ्या

Lucky Zodiac Signs : 10 वर्षांनंतर जुळून आला 'त्रिग्रही योग'! 11 सप्टेंबरला मिथुन, धनुसह 5 राशींना लॉटरी लागण्याची शक्यता; जुन्या गुंतवणुकीतूनही मिळणार बंपर परतावा

SCROLL FOR NEXT