मुंबई

रेल्वे पोलिसाची चपळाई; धावत जाऊन वाचवले वृद्ध प्रवाशाचे प्राण

सकाळ वृत्तसेवा
  • मुंबईच्या दादर स्टेशनवर घडलेला थरारक प्रकार कॅमेऱ्यात झाला कैद

  • रेल्वे मंत्र्यांनी स्वत: व्हिडीओ ट्वीट करत पोलिसाची थोपटली पाठ

मुंबई: येथील लोकल सेवा (Mumbai Local) म्हणजे गर्दी. त्यातच दादर स्टेशन (Dadar Station) असेल तर गर्दीचा (Crowd) विचार न केलेलाच बरा. पण सध्या सुरू असलेल्या लॉकडाउनमुळे (Lockdown) सरसकट लोकांना रेल्वे प्रवासाची परवानगी नाही. त्यामुळे गुरूवारी दादर स्टेशनवर फारशी गर्दी नव्हती. त्यावेळी धावत्या ट्रेनमधून (Running Train) उतरत असताना वृद्ध प्रवाशाचा तोल गेला अन् तो ट्रेन आणि प्लॅटफॉर्म (Platform) यांच्या मधल्या जागेत अडकण्याच्या बेतात होता. तो डब्ब्यातून खाली पडतोय हे एका रेल्वे पोलिसाच्या लक्षात आले. ते पाहताच आरपीएफ (RPF) जवानाने अक्षरश: धावत जाऊन प्रवाशांच्या साथीने त्या वृद्ध माणसाचे प्राण वाचविले. ही घटना सीसीटीव्हीमध्ये (CCTV) कैद झाली आणि अपेक्षेप्रमाणे व्हिडीओ व्हायरल झाला. इतकेच नव्हे तर खुद्द रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी या रेल्वे पोलिसाचा व्हिडीओ ट्विट करत त्याला शाबासकी दिली. (Viral Video Mumbai Railway Protection Force Jawan saves life of senior citizen at Dadar station)

नक्की काय घडलं?

मध्य रेल्वेकडून मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी 11 वाजून 08 मिनिटांचा सुमारास गाडी क्रमांक 02194 वाराणसी-मुंबई महानगरी विशेष गाडी दादर स्थानकाच्या फलाट क्रमांक 6 वर आली होती. वाराणसी-मुंबई महानगरी विशेष गाडी आपल्या ठरलेल्या वेळेनंतर त्याच्या गंतव्य स्थानकाकडे रवाना होत होती. या दरम्यान गाडीचा वेग वाढत असताना एक वृद्ध प्रवासी धावत्या ट्रेनमधून उतरण्याचा प्रयत्न करत होता. मात्र, ट्रेनच्या दरवाज्यामधून फलाटावर उतरत असताना त्या वृद्ध प्रवाशांचा पाय घसरला. रेल्वे फलाट आणि ट्रेनच्या मधल्या पोकळीत पडत असताना कर्तव्यांवर असलेल्या आरपीएफ कॉन्स्टेबल उमेश माळी यांनी प्रसंगावधान दाखवून इतर प्रवाशांच्या मदतीने त्या प्रवाशांला ट्रेन जवळून खेचून त्याचे प्राण वाचविले.

रेल्वे पोलिसांनी वृद्ध प्रवाशाची विचारपूस केली असता, विजय कुमार पटेल (59) असे नाव त्याने सांगितले. पटेल हे उल्हासनगरचे रहिवासी असून वाराणसीवरून मुंबईला येत होते. या दरम्यान ही घटना दादर स्थानकावर घडली. मात्र, सुदैवाने उमेश माळी यांच्यामुळे त्यांचे प्राण वाचले. या घटनेनंतर त्यांनी रेल्वे पोलिसांचे आभार मानले.

पाहा व्हिडीओ-

आरपीएफ कर्मचारी प्रवाशांच्या सुरक्षेसाठी नेहमी तत्पर आणि सर्तक असतात. अनेकदा जीव धोक्यात घालून शेकडो प्रवाशांचे प्राण त्यांनी वाचले आहेत. आरपीएफ कॉन्स्टेबल उमेश माली यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे एका वृद्ध प्रवाशाचा जीव वाचला आहे. त्यामुळे माली यांना दोन हजार रुपयांचे बक्षीस मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक आलोक कंसल यांनी दिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Wadettiwar : हेमंत करकरे प्रकरणात वडेट्टीवारांनी दिला 'या' पुस्तकाचा दाखला; उज्ज्वल निकम यांच्यावरही गंभीर आरोप

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

IPL 2024 LSG vs KKR Live Score: लखनौला तिसरा धक्का, कर्णधार केएल राहुलपाठोपाठ दीपक हुड्डाही आऊट

Vijay Wadettiwar : ''हेमंत करकरेंची हत्या पोलिसांकडून'', विजय वडेट्टीवारांचा आरोप अन् फडणवीसांचा पलटवार

IPL 2024: हर्षल तुला निवृत्तीच्या दिवसात CSKचं काँट्रॅक्ट मिळणार नाही! धोनीला शुन्यावर बाद करणारा गोलंदाज होतोय ट्रोल

SCROLL FOR NEXT