mumbai 
मुंबई

धक्कादायक! महिला वेबसिरीज पाहत चालवतेय दुचाकी; Viral Video

या व्हिडिओमध्ये एक महिला चालत्या गाडीवर वेबसिरीज पाहताना दिसत आहे.

सकाळ डिजिटल टीम

गोरेगाव : सध्या ऑनलाईल युगात अनेक नव्या घटना सातत्याने समोर येत असतात. दरम्यान, तरुणाईमध्ये वेबसीरीजची (Web series) क्रेज वाढते आहे. विविध माध्यमांद्वारे ते चित्रपट किंवा काही नाटक हे आपल्या वेळेनुसार पाहू शकतात. सध्या अनेकांच्या पसंतीस उतरलेली शार्क टँक इंडिया या बहुचर्चित वेबसीरीजने लोकांना भुरळ घातली आहे. फावल्या वेळेत अनेकजण ही वेबसिरीज पाहण्याचा आनंद घेत आहेत. मात्र, हे सगळे सुरु असताना गोरेगाव येथील वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. (Video Viral) एक महिला महामार्गावरुन दुचाकी चालवाताना वेबसिरीज पाहत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. तिचा हा जीव धोक्यात घालून प्रवास करतानाचा व्हिडिओ पाहून अनेकांना यावर कमेंट केल्या आहेत.

या व्हिडिओमध्ये एक महिला चालत्या गाडीवर वेबसिरीज पाहताना दिसत आहे. ती शार्क टँक इंडिया ही वेबसीरीज बघत आहे. ही महिला कोण आहे हे माहित नाही. पण, ती जे करत होती ते अतिशय धोकादायक असल्याची चर्चा सुरु आहे. (Mumbai) इकडे शासनाने वाहन चालवताना मोबाईल फोनवर बोलल्यास दंड आकारला जाईल किंवा योग्य ती कारवाई केली जाईल असे आदेश दिले असले तरी ही महिला चक्क वेबसिरीज बघत दुचाकी चालवत आहे. यामुळे अनेक अनर्थ घडू शकतात. दरम्यान, सध्या महानगरातून सतत वाहनांच्या अपघाताच्या बातम्या येत असतात. तरीही लोकं सर्रासपणे निर्बंधांचे उल्लंघन करताना दिसत आहेत. नागरिकांचा निष्काळजीपणा वाढत्या अपघातांच प्रमुख कारण आहे त्यामुळे प्रशासन आता यावर कोणता निर्णय घेणार असे सवाल उपस्थित होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"मॅडम, तुम्ही कम्प्लीट वुमन आहात.. सरकार येऊ द्या, तुम्हाला सीएम कोट्यातून IAS करतो'' बड्या नेत्याचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल

IND vs AFG 2nd T20I: संजू सॅमसनने सर्वांची बोलती बंद केली, भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली! मालिका जिंकली

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

Aadul Theft : आडूळ परिसरात आठवडाभरापासून चोरट्यांचा धुमाकूळ! दुकान, मंदिरांच्या दानपेट्या, बकऱ्या व कोंबड्या चोरीला; नागरिकांत भीतीचे वातावरण

IND vs AFG 2nd T20I: नितीश कुमार चमकला, अर्शदीप सिंगनेही करेक्ट कार्यक्रम केला; अफगाणिस्तानला मोजक्याच धावा करता आल्या

SCROLL FOR NEXT