Hotelier-Virar 
मुंबई

लॉकडाऊन जीवावर बेतला; विरारच्या हॉटेल व्यावसायिकाची आत्महत्या

लॉकडाऊन जीवावर बेतला; विरारच्या हॉटेल व्यावसायिकाची आत्महत्या दोन लहान मुलांनी गमावले वडिलांचे छत्र Virar Hotelier commits suicide due to Thackeray Govt imposed lockdown restrictions

विजय गायकवाड

दोन लहान मुलांनी गमावले वडिलांचे छत्र

नालासोपारा: लॉकडाऊनमुळे आलेल्या आर्थिक टंचाईला कंटाळून विरारमध्ये एका नामवंत हॉटेल व्यवसायिकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी घडली. आत्महत्येपूर्वी त्याने एक चिट्ठी ही लिहून ठेवली होती. त्यात काही जणांच्या नावांचा उल्लेख असल्याची माहिती आहे. पण पोलिसांनी त्या चिट्ठीतील मजकूर गुप्त ठेवला आहे. त्यामुळे आत्महत्येमागील खरं कारण काय, अद्याप अधिकृतरित्या स्पष्ट झालेले नाही. याबाबत प्राथमिक माहितीनुसार, अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात अकस्मिक मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू आहे. करुणाकरण पुत्रन असे या आत्महत्या केलेल्या हॉटेल मालकाचे नाव आहे. त्यांचे वय 48 वर्षे होते. पुत्रन यांना दोन लहान मूलं असून या मुलांना वडिलांचे छत्र गमवावे लागले. (Virar Hotelier commits suicide due to Thackeray Govt imposed lockdown restrictions)

Star-Planet-Hotel

विरार पश्चिम येथील वाय के नगर परिसरात असलेल्या स्टार प्लॅनेट या हॉटेलचे संचालक करुणाकर पुत्रन (48) यांचा मृतदेह गुरूवारी सकाळी 9 च्या सुमारास हॉटेलमधील छताला लटकलेला दिसला. अर्नाळा सागरी पोलिसांना वर्दी मिळाल्यावर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह ताब्यात घेत शव विच्छेदनासाठी पाठविण्यात आला. पोलिसांना या ठिकाणी एका चिट्ठी मिळाली. त्या चिट्ठीत, 'अनेक दिवसांपासून हॉटेल चालत नसल्याने आर्थिक तंगी निर्माण झाली होती. हॉटेल मालकाचे भाडे थकले होते. लाईट बिल भरायला पैसे नव्हते, कामगारांचा पगार निघत नव्हता. हॉटेल मालक भाड्यासाठी तगादा लावत होते. या सर्व आर्थिक टंचाईला कंटाळून आत्महत्या करत आहे', अशा आशयाचे पत्र लिहिले असल्याची कुजबूज ग्रामस्थांमध्ये आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: शुभमनच्या २६९ धावा अन् नंतर आकाश दीपचा भेदक मारा! इंग्लंडच्या संघाची घरच्या मैदानावर झालीय वाईट अवस्था

IND vs ENG 2nd Test : शुभमन गिल OUT होताच इंग्लंडच्या चाहत्यांनी काय केलं? विश्वास बसणार नाही, Video Viral

Chicago Firing: रेस्टॉरंटबाहेर बेछूट गोळीबार; ४ जणांचा मृत्यू, १४ जण जखमी, घटनेचा थरारक व्हिडिओ व्हायरल

Nitin Gadkari flight emergency landing : मोठी बातमी! आता नितीन गडकरींच्या विमानाचे झाले इमर्जन्सी लँडिंग; जाणून घ्या, नेमकं काय घडलं...?

BJP President: भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी महिलेला संधी? निर्मला सीतारामन यांच्यासह 'या' नावांची होतेय चर्चा

SCROLL FOR NEXT