मुंबई

तुम्हीही ऑस्ट्रेलिया, कॅनडात नोकरीसाठी अप्लाय करतायत ? फक्त एक मिनिट लागेल, आधी ही बातमी वाचा

अनिश पाटील

मुंबई : बनावट वेबसाईटच्या माध्यमातून देभरातील गरजू तरुणांना परदेशात चांगल्या पगाराच्या नोकरीचे अमिष दाखवून त्याची ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या टोळक्याचा पर्दाफाश करण्यात सायबर पोलिसांना यश आले आहे.

याप्रकरणी पुण्यातून चार परदेशी नागरिकांना अटक केली आहे. ३२ वर्षीय ओगुनसकिन ऊर्फ मिशेल ओलायेनी , २५ वर्षीय सोटोमिवा थॉम्सन, २६ वर्षीय ओपेयेमी ओडेले ओगुनमोरोटी, २२ वर्षीय ओगिस्टीन फ्रांसिस विल्यियम्स अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

चेंबूर येथे राहणारे ३० वर्षीय विशाल मांडवकर हे वेबसाईच्या माध्यमातून परदेशात नोकरी शोधत होते. त्या वेळी त्यांना हिल्टन हॉटेल अ‍ॅण्ड सुईट कॅनडा येथे नोकरी असल्याची जाहिरात दिसली. जाहिरातीतील नमूद ई-मेल अ‍ॅड्रेसवर मांडवकर यांनी आपला बायोडाटा पाठवला. त्यानंतर त्यांना हिल्टन हॉटेलमध्ये नोकरी लागल्याचे नियुक्तीचे पत्र यातील आरोपींनी मांडवकर यांना पाठवले आणि मुंबईतील त्यांच्या प्रतिनिधीचा मोबाईल क्रमांक देऊन त्याला भेटण्यास सांगितले.

त्यानुसार मांडवकर यांनी त्या व्यक्तीशी संपर्क साधला असता व्हिजा फी, पोग्राम फी, एम्प्लॉयमेंट अ‍ॅथोरायजेशन फी, बेसिक ट्रॅन्हलिंग फी अशी वेगवेगळी कारणे सांगून आरोपींनी मांडवकर यांना वेगवेगळ्या बँक खात्यात पैसे भरण्यास सांगून नोकरी न लावता त्यांची 17 लाख 22 हजार 800 रुपयांची फसवणूक केली.

याप्रकरणाची तक्रार मुंबईतील वांद्रे कुर्ला सायबर पोलिस ठाण्यात दाखल होताच सायबर पोलिसांनी तपास करून यातील आरोपी हे नायजेरियन असून ते पुणे येथे वास्तव्यास असल्याचे उघड झाले. त्यावरून तीन नायजेरियन आणि एका पश्चिम आफ्रिकी नागरिकाला अटक केली. 

vishal from chembur duped for 17 lac 22 thousand by fraud recruitment agency formed by Nigerians

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICC ODI World Cup Schedule : प्रतीक्षा संपली! वन डे वर्ल्ड कप २०२७ स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर; India vs Pakistan सामना कधी व केव्हा; जाणून घ्या टीम इंडियाचे टाईमटेबल

ICC ODI World Cup 2027 India Fixture: India vs Pakistan एकदा नव्हे, तर तीनवेळा भिडणार, जाणून घ्या कधी व कुठे खेळणार...

Crop Panchnama Maharashtra : दुष्काळी तालुक्यांत सुट्टीच्या दिवशीही पीक पंचनामे करा; ग्रामसेवक, तलाठ्यांना जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश, तीन दिवसाच्या सुट्ट्या रद्द

Dhananjay Munde : दुष्काळ प्रश्नी धनंजय मुंडे मुख्यमंत्र्यांना भेटले; पीएम किसान व नमो शेतकरी सन्मान चे दोन दोन हप्ते तातडीची मदत म्हणून वितरीत करण्याची मागणी

IND vs WI: प्रसिद्ध कृष्णानंतर वॉशिंग्टन सुंदरलाही मालिकेतून केलं OUT! चाहत्यांना धक्का, पण दुखापत नसताना का घेतला हा निर्णय?

SCROLL FOR NEXT