वसई ः जंजिरे-वसई किल्ला इतिहास सफरीत सहभागी झालेले दुर्गमित्र. 
मुंबई

दृष्टिहीन विद्यार्थ्यांची डोळस सफर

सकाळ वृत्तसेवा

विरार ः मुंबई टीम व्हीजन आणि भोवरा संस्थेंतर्गत दृष्टिहीन विद्यार्थ्यांसाठी पालघर जिल्ह्यातील जंजिरे-वसई किल्ल्यावर इतिहास सफर नेण्यात आली. या मोहिमेत एकूण ६० विद्यार्थी व दुर्गमित्रांनी उत्साहाने सहभागी होऊन डोळसपणे वसईचा इतिहास जाणून घेतला. यावेळी विद्यार्थ्यांनी किल्ल्यावर मनसोक्त भटकंती केली. 

मुंबईतील टीम व्हीजन संस्था दृष्टिहीन विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी, परीक्षेच्या काळात वाचक आणि लेखक उपलब्ध करून देण्याचे कार्य करते. आजच्या अभ्यास सफरीत एमए शाखेचे एकूण २० दृष्टिहीन विद्यार्थी सहभागी झाले होते. विद्यार्थी मित्रांना जंजिरे-वसई किल्ल्यातील वास्तूविशेषांची सविस्तर माहिती देण्यासाठी उत्तर कोकण प्रांताचे इतिहास अभ्यासक डॉ. श्रीदत्त राऊत उपस्थित होते. त्यांची ही ५६२ वी इतिहास अभ्यास सफर होती. अभ्यास मोहिमेची नरवीर चिमाजी आप्पा स्मारकातून सुरुवात झाली. 

नरवीर चिमाजी आप्पा स्मारक, डॉमिनिक चर्च, श्री वज्रेश्‍वरी मंदिर, टाऊन इमारत, साखर कारखाना, बालेकिल्ला, श्री नागेश्‍वर मंदिर, श्री हनुमान मंदिर, दर्या दरवाजा आदी १५ हून अधिक ऐतिहासिक वास्तूंची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. तब्बल सात तास सुरू असलेल्या या इतिहास मार्गदर्शन मोहिमेत शालेय विद्यार्थी मित्रांना जंजिरे वसईचे वास्तुवैभव, इतिहासाबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

मोहिमेत राऊत यांनी वसई किल्ला परिसराचे जुने नकाशे यावर मार्गदर्शन केले. मोहिमेत सहभागी झालेल्या समस्त दुर्गमित्रांनी दृष्टिहीन विद्यार्थ्यांना किल्ला दर्शन वाटचाल करण्यात सहकार्य केले. मोहिमेत मुंबई, पनवेल, दादर, पालघर, दिवा, दहिसर आदी भागांतून विद्यार्थी सहभागी झाले होते. मोहिमेचा समारोप श्री हनुमान मंदिर दर्या दरवाजा येथे करण्यात आला.  

जंजिरे-वसई किल्ला संवर्धनासाठी सर्वच स्तरावर जागृती व्हावी, या उद्देशाने दृष्टिहीन विद्यार्थ्यांची इतिहास सफर काढण्यात आली. वसई आणि  पालघर प्रांतातील अन्य ऐतिहासिक स्थळांवरदेखील ही मोहीम नियमितपणे राबवणार आहे. 
अमोल काटदरे, भोवरा संस्था, प्रतिनिधी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gujarat High Court: मोदींचं डिग्री प्रकरण! अरविंद केजरीवालांची याचिका फेटाळली, उच्च न्यायालयाने २५ हजारांचा दंड ठेवला कायम

जनता दुष्काळात, तहसीलदार सुट्टीवर; जिल्हाधिकाऱ्यांनी पदभारच काढून घेतला, अधिकारी उरला नावाला

Pune Rain Water : कोट्यवधींच्या कामांनंतरही रस्त्यावर तुंबले पाणी; पावसाने प्रशासनाची पोलखोल

Marathi News Live Updates: प्रियकराच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने दिला जीव

Pune News : पुण्यातील ‘रामा’ला कोण वाचविणार? आयुक्तांना दिलेल्या धमकीचा विरोधीपक्षाकडून निषेध

SCROLL FOR NEXT