मुंबई

ज्येष्ठ लोककलावंत गुलाबबाई संगमनेरकर यांना विठाबाई नारायणगांवकर जीवनगौरव पुरस्कार जाहीर

सकाळ वृत्तसेवा


मुंबई : ज्येष्ठ लोककलावंत गुलाबबाई संगमनेरकर  यांना यंदाचा तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगांवकर जीवन गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला. रुपये पाच लाख, मानपत्र व मानचिन्ह असे या पुरस्कारचे स्वरुप आहे. तमाशा क्षेत्रात प्रदीर्घ सेवा केलेल्या कलाकारास हा पुरस्कार देण्यात येतो.

अवघ्या नऊ वर्षांच्या असल्यापासून गुलाबताई यांनी स्वतःला या लावणी नृत्यकलेत झोकून दिले. वयाच्या 14 व्या वर्षी त्यांनी स्वतःची संगीत पार्टी सुरू केली. त्या मराठी तमाशा परिषदेच्या सदस्या आणि पुण्यातील लावणी विकास संघाच्या मानद अध्यक्षा आहेत. गुलाबताई संगमनेरकर सुरुवातीला राधाबाई बुधगांवकर पार्टीत काम करत होत्या. बबुताई शिर्डीकर, सुगंधाताई सिन्नरकर, महादू नगरकर यांच्याकडे त्यांनी शिक्षण घेतले.

दुर्लक्षीत राहिलेल्या या कला प्रकारावर उदरनिर्वाह चालविताना गुलाबबाईंना त्याचा अभ्यास, शास्त्रीय व कलात्मक दर्जा ओळखून यशवंतराव चव्हाण, जयश्री गडकर, यशवंत दत्त यांसारखे चाहते लाभले. त्यांचे कार्यक्रम मुंबई-दिल्ली दूरदर्शनहून प्रसारित करण्यात आले होते. त्यांनी परदेशी पर्यटकांसमोर 'गाढवाचं लग्न' या वगनाट्यात सहभाग घेतला.

विठाबाईंच्या नावाचा मला पुरस्कार मिळाला याचा मला खूप आनंद झाला. मला हा पुरस्कार दिल्याबद्दल मी सर्वांचे आभार मानते
- गुलाबबाई संगमनेरकर, ज्येष्ठ लोककलावंत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shiv Sena Symbol Dispute : दोन्ही गटांना नवे नाव, चिन्हे का दिली नाहीत? शिवसेना पक्षाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचा सवाल

India ODI Squad : भारताच्या वनडे संघात Rishabh Pant ला का मिळाली नाही संधी? ही असू शकतात ३ महत्त्वाची कारणं

Latest Marathi News Update : भाजपच्या माजी आमदारावर गुन्हा, मध्यरात्री तरूणीला फार्महाऊसवर बोलवून गैरकृत्य

Gokul Milk Union : गोकुळमधील अवसायनातील संस्थांना दिलासा, सर्वोच्च न्यायालयातील याचिका फेटाळली; ४९२ संस्थांचा मतदानाचा अधिकार कायम

‘देवमाणूस’नंतर किरण गायकवाडची नवी इनिंग; राजकारण अन् गुन्हा… ‘एफआयआर नं. ४६९’मध्ये नेमकं काय पाहायला मिळणार?

SCROLL FOR NEXT