voting sakal
मुंबई

स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी होणार आज मतदान

राज्यातील ९३ नगरपंचायतींतील ३३६ जागांचा समावेश ; उद्या एकत्रित मतमोजणी

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाच्या (supreme court)निकालामुळे मागासवर्गीयांच्या अनारक्षित झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जागांवर उद्या (ता .१८ ) मतदान(voting) होत आहे. यापूर्वी २१ डिसेंबरला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या खुला वर्ग आणि अनुसुचित जाती-जमातीच्या आरक्षित जागांसाठी मतदान झाले होते. या दोन्ही निवडणुकांची मतमोजणी १९ जानेवारीला एकत्रित होणार आहे. राज्यातील ९३ नगरपंचायतीतील ३३६ जागांसाठी मतदान होईल. भंडारा जिल्हा परिषदेच्या १३ आणि गोंदिया जिल्हा परिषदेच्या १०; तसेच या दोन्ही जिल्ह्यांतील पंचायत समित्यांतील ४५ जागांसाठीही मतदान होत आहे. विविध जिल्ह्यांतील १९५ ग्रामपंचायतींमधील २०९ रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी तसेच सांगली- मिरज- कुपवाड महानगरपालिकेच्या (sangli miraj kupwad corporation)एका पोटनिवडणुकीसाठीदेखील मतदान होईल.

सर्वोच्च न्यायालयाने मागासवर्गीयांची लोकसंख्या निश्चित करण्यासाठी इंपिरिकल डेटाची (empirical data)आवश्यकता व्यक्त केली होती. राज्य मागासवर्गीय आयोगाकडून अशा प्रकारे इंपिरिकल डेटा तयार करुन न घेतल्याने निवडणुकीतील मागासवर्गीयांच आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने (supreme court)रद्द करुन त्या जागा खुल्या केल्या. त्याचा फटका स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जाहीर झालेल्या निवडणुकांना बसला आहे.प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणात मागासवर्गीयांच्या अनारक्षित जागांवर खुल्या वर्गात निवडणुका होत आहेत. शिर्डीतील ४ आणि कळवणमधील २ जागा त्याचबरोबर माळशिरस आणि देवळा येथेही प्रत्येकी एक जागा बिनविरोध झाली. त्यामुळे तेथे मतदान(voting) हाेणार नाही.

मतदान होत असलेल्या नगरपंचायती

  1. ठाणे- मुरबाड व शहापूर, रायगड- खालापूर, तळा, माणगाव, म्हसळा, पोलादपूर, पाली (नवनिर्मित),

  2. रत्नागिरी- मंडणगड, दापोली,

  3. सिंधुदुर्ग- कसई-दोडामार्ग, वाभवे-वैभववाडी, कुडाळ, देवगड- जामसंडे,

  4. पुणे- देहू (नवनिर्मित),

  5. सातारा- लोणंद, कोरेगाव, पाटण, वडूज, खंडाळा, दहीवडी,

  6. सांगली- कडेगाव, खानापूर, कवठे-महाकाळ, सोलापूर- माढा, माळशिरस, महाळूंग-श्रीपूर (नवनिर्मित), वैराग (नवनिर्मित), नातेपुते (नवनिर्मित),

  7. नाशिक- निफाड, देवळा, कळवण, दिंडोरी धुळे- साक्री,

  8. नगर- अकोले, कर्जत, पारनेर,

  9. जळगाव- बोदवड,

  10. औरंगाबाद- सोयगाव, जालना- बदनापूर, जाफ्राबाद, मंठा, घनसावंगी, तीर्थपुरी (नवनिर्मित), परभणी- पालम, बीड- केज, शिरूर-कासार, वडवणी, पाटोदा, आष्टी,

  11. लातूर- जळकोट, चाकूर, देवणी, शिरूर-अनंतपाळ,

  12. उस्मानाबाद- वाशी, लोहारा बु., नांदेड- नायगाव, अर्धापूर, माहूर, हिंगोली- सेनगाव, औंढा-नागनाथ,

  13. अमरावती- भातकुली, तिवसा,

  14. बुलडाणा- संग्रामपूर, मोताळा, यवतमाळ- महागाव, कळंब, बाभुळगाव, राळेगाव, मारेगाव, वाशीम- मानोरा,

  15. नागपूर- हिंगणा, कुही, वर्धा- कारंजा, आष्टी, सेलू, समुद्रपूर,

  16. भंडारा- मोहाडी, लाखनी, लाखांदूर,

  17. गोंदिया- सडकअर्जुनी, अर्जुनी, देवरी, चं

  18. द्रपूर- सावली, पोंभुर्णा, गोंडपिपरी, कोरपना, जिवती, सिंदेवाही-लोनवाही,

  19. गडचिरोली- अहेरी, चामोर्शी, सिरोंचा, धानोरा, कुरखेडा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: शुभमन गिलने जिंकलं 'दिल'! ऐतिहासिक कामगिरी अन् इंग्लंडला न पेलवणारे लक्ष्य; भारताच्या १०००+ धावा

Central Railway: मध्य रेल्वेची ज्येष्ठांसाठी मोठी घोषणा

लग्न न करताच ४० व्या वर्षी जुळ्या मुलांची आई होणार अभिनेत्री; म्हणाली, 'आपल्याकडे एकटी स्त्री...

Aurangabad Murder Case : काकाच्या प्रेमात पडलेल्या महिलेने ४० लाख अन् प्लॉट हडपण्यासाठी काढला पतीचा काटा!

IND vs ENG 2nd Test: इंग्लंडच्या खेळाडूने रिषभ पंतला दाखवलं 'आमिष'; आपल्या पठ्ठ्याने काय उत्तर दिले पाहा, Viral Video

SCROLL FOR NEXT