खोपोली : कारची पाहणी करताना पोलिस अधिकारी.  
मुंबई

धक्कादायक : मित्रांसोबत फिरायला गेला अन्‌ गाडीत मृतदेह! 

अनिल पाटील

खोपोली : खालापूर तालुक्‍यातील होराळे गावातील एक तरुण कारमधून फिरायला गेला; मात्र त्याच गाडीमध्ये मंगळवारी (ता. 25) त्याचा मृतदेह सापडल्याने सर्वांना धक्काच बसला. पंकज दळवी (वय 25) असे मृताचे नाव आहे. आपल्या मित्रांसह बाहेर फिरायला गेलेल्या पंकजचा मृत्यू आणि तोही फिरायला गेलेल्या गाडीत झाल्याने परिसरात आता तर्कवितर्कांना वेग आला आहे. त्यामुळे या घटनेबाबत गूढ वाढले आहे. 

पंकजसोबत असलेल्या मित्रांनी याविषयी पोलिसांना माहिती दिली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पंकज हा गाडीतील मागच्या सिटवर दारू पिऊन झोपला होता. गतिरोधकावरून गाडी उडाली आणि पंकजचा हात झोपेत गाडीच्या दरवाजाच्या हॅंडलवर पडला. त्यामुळे गाडीचे दार उघडले व पंकज घाडीबाहेर रस्त्यावर पडला. त्यात तो बेशुद्ध झाला. कारचालकाच्या लक्षात आल्यावर त्याने गाडी थांबवून पंकजला गाडीतील मधल्या सिटवर आडवे झोपवले आणि घराकडे गाडी घेऊन निघाला; मात्र रस्त्यात गाडीतील डिझेल संपल्यावर गाडी बंद पडली. पुढे सकाळपर्यंत पंकज गाडीतच झोपल्याचे त्यांचे म्हणणे आहे; मात्र पंचनामा करतेवेळी पंकजचे डोके मागील बाजूकडून फुटले होते. 

अतिरक्तस्राव झाल्याने पंकजचा मृत्यू झाला असावा, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे; मात्र हा अपघात आहे की घातपात हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. या प्रकरणातील नेमकी वस्तुस्थिती काय व घटनेतील सत्य काय, याबाबत उलटसुलट चर्चा होत आहे. 

खालापूर पोलिस सर्व शक्‍यता बघून तपास करीत आहेत. दुसरीकडे पंकजच्या कुटुंबातील सदस्यांनी हा घातपात असून, या घटनेमागे वेगळे काही तरी घडल्याची शक्‍यता व्यक्त केली आहे. ही घटना वावोशी उपपोलिस ठाणे क्षेत्रात घडली. वावोशी पोलिस ठाण्यातील हवालदार जे. पी. म्हात्रे व उपनिरीक्षक अंबिका अंधारे 
यांनी घटनेची माहिती खालापूरचे निरीक्षक विश्‍वजित काईंगडे, विभागीय पोलिस अधिकारी डॉ. रणजित पाटील यांना दिली आहे. 

(संपादन- बापू सावंत)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prashant Jagatap Resignation : शरद पवारांच्या पक्षाला महापालिका निवडणुकीआधी पुण्यात मोठा धक्का; प्रशांत जगताप यांनी सोडलं शहाराध्यक्ष पद!

Vijay Hazare Trophy: विजय हजारे ट्रॉफीत रनफेस्ट! अहमदाबादमध्ये कर्नाटकचा महापराक्रम; झारखंडची मोठी धावसंख्या अपुरी

''तेव्हाच बदला घ्यायला पाहिजे होता'', अ‍ॅसिड हल्ल्यातील आरोपीची सोळा वर्षांनंतर निर्दोष मुक्तता; पीडितेचा टाहो

Pratap Sarnaik: नसबंदी नाही, बिबट्या दत्तक योजनेची गरज; प्रताप सरनाईक यांचं प्रतिपादन

Dhule Municipal Election : कोणाला 'हो' म्हणावे अन् कोणाला 'नाही'? इच्छुकांच्या गर्दीने भाजपचे नेते 'स्ट्रेस'मध्ये

SCROLL FOR NEXT