मुंबई

कटिंगला जायचे आहे? खिशालाही मोठी कात्री बसणार! काय असतील संभावित दर; वाचा

सकाळ वृत्तसेवा

मुंबई ः लॉकडाऊन कधी संपणार आणि कटिंग कधी करणार या प्रश्नाने अनेकांना सतावले आहे, पण आता कटिंग करायला जाल, त्यावेळी खिशाचेही मोठ्या प्रमाणावर कटिंग होणार असल्याची तयारी ठेवायला हवी. कोरोनाच्या आक्रमणामुळे सलून दुकानांसाठी नवी नियमावली येत आहे, त्यामुळे कटिंगचे दर दुपट होणार आहेत.

होय, हेअर कटिंगचा दर 80 - 100 ऐवजी 200 होणार आहे, तर जाढीचा दर 40 - 50 वरुन 100 वर जाणार आहे. आता कदाचीत हे कमीतकमी दर असतील. सलूनमधील उपलब्ध सुविधा, कुशल कारागीर, दुकानाचे भाडे यानुसार दरात वाढही होऊ शकते, असे सूत्रांनी सांगितले आहे. 
सलूनमध्ये सुरक्षित अंतर बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे केस कर्तन तसेच अन्य कामे करताना कमालीचे उपाय अमलात आणण्याची सूचना करण्यास सांगितले आहे. त्यानुसार हँडग्लोव्ह््ज, पीपीई किट सक्तीचा करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. त्याचबरोबर केशकर्तनालयाचे नियमीतपणे निर्जंतुकीकरणही करावे लागणार आहे. त्याचबरोबज ज्या ठिकाणी यापूर्वी चार खुर्च्या होत्या, तिथे दोनच खुर्च्या ठेवण्याची सूचना देण्यात आली आहे. केस कापण्यासाठी जाणाऱ्या ग्राहकांना आपला आधार तसेच मोबाईल क्रमांकही देणे बंधनकारक केले जाण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर आगाऊ सूचनेनुसारच दुकानात जाणे बंधनकारक असेल तसेच कोणतेही काम सुरु करण्यापूर्वी तपमानही बघण्याची सूचना आहे.

काही दुकानदारांना दिलेल्या माहीतीनुसार कटिंगच्या वेळा घातला जाणारा अॅप्रॉन तसेच दाढीच्यावेळी घातला जाणारा टॉवेलही ग्राहकास आणण्याची सक्ती करण्यात येणार आहे. हे ग्राहकाने आणले नसल्यास त्याला ते विकण्याची मुभाही देण्यात आली आहे, पण त्याची पिशवी सिलबंद असणे बंधनकारक असेल असेही काही विक्रेत्यांनी सांगितले. महाराष्ट्रात एकंदर 9 लाख केशकर्तनालय आहेत आणि त्यावर 70 लाख लोकांचा रोजगार अवलंबून असल्याचे सांगितले जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"मॅडम, तुम्ही कम्प्लीट वुमन आहात.. सरकार येऊ द्या, तुम्हाला सीएम कोट्यातून IAS करतो'' बड्या नेत्याचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल

IND vs AFG 2nd T20I: संजू सॅमसनने सर्वांची बोलती बंद केली, भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली! मालिका जिंकली

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

Aadul Theft : आडूळ परिसरात आठवडाभरापासून चोरट्यांचा धुमाकूळ! दुकान, मंदिरांच्या दानपेट्या, बकऱ्या व कोंबड्या चोरीला; नागरिकांत भीतीचे वातावरण

IND vs AFG 2nd T20I: नितीश कुमार चमकला, अर्शदीप सिंगनेही करेक्ट कार्यक्रम केला; अफगाणिस्तानला मोजक्याच धावा करता आल्या

SCROLL FOR NEXT