Leopard sakal media
मुंबई

पडक्या विहिरीत पडून बिबट्याचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा

वासिंद: वासिंदपासून (Wasind) दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या गावाजवळील घाटाळ पाडा (Ghatalpada) येथील एका पडक्या विहिरीत (Well) पडून बिबट्याचा (leopard) मृत्यू झाला. याबाबत माहिती मिळताच वनविभागाच्या अधिकारी (Forest Authorities) व कर्मचाऱ्यांना घटनास्थळी दाखल होऊन मृत बिबट्याला बाहेर काढले.

पिवळीजवळील वांद्रे येथील घाटाळ पाडा या आदिवासी पाड्यावर असलेल्या एका जुन्या पडक्या विहिरीत बिबट्या पडला असून त्या ठिकाणी दुर्गंधी येत असल्याची माहिती येथील शिवसेना शाखाप्रमुख विजय रेरा यांनी दिली. या भागात मोठ्या प्रमाणात पाऊस असल्याने व कठडा तुटलेल्या अवस्थेतील या पडीक विहिरीवर स्थानिक रहिवाशांची वर्दळ नसल्याने बिबट्या विहिरीत पडल्याचे उशिरा लक्षात आले, असे पर्यावरणवादी संस्थेचे अध्यक्ष रवींद्र गोतारणे यांनी सांगितले.

बिबट्याला रात्री शासकीय जागेत ठेवून त्यानंतर शवविच्छेदन करण्यात आले. बिबट्या पाण्यात बुडून मरण पावल्याचे प्राथमिक अहवालात नमूद झाले असल्याचे शहापूर वनक्षेत्रपाल प्रकाश चौधरी यांनी म्हटले आहे. हा बिबट्या अंदाजे साडेतीन वर्षांहून अधिक वयाचा असून याबाबत पुढील आवश्यक तपासणी केली जाणार असल्याचे चौधरी यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : पुढचे २४ तास महत्त्वाचे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता

Kasba Ganpati Pune: पुण्यातल्या कसबा गणपती मंडळाकडून दिलगिरी व्यक्त; विसर्जन मिरवणुकीला १३४ वर्षांत पहिल्यांदाच उशीर

IND vs WI : शुभमन गिलची विंडीज मालिकेतून माघार? मोहम्मद सिराजच्या वेगवान चेंडूवर दुखापत; BCCI च्या डॉक्टरांची पळापळ

Nepal PM: संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनात नेपाळच्या पंतप्रधानांची जागतिक व्यवस्थेवर जोरदार टीका; भारताचाही उल्लेख

PM Kisan 24th Installment : पीएम किसानच्या २४व्या हप्ता ऑक्टोबरमध्ये मिळणार? शेतकऱ्यांना प्रतीक्षा; दसऱ्यापूर्वी खात्यात जमा होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT