ठाणेकरांनो, तुमच्यासाठी महत्त्वाचे...या दिवशी पाणीपुरवठा राहणार बंद 
मुंबई

ठाणेकरांनो, तुमच्यासाठी महत्त्वाचे...या दिवशी पाणीपुरवठा राहणार बंद

सकाळ वृत्तसेवा

ठाणे : ठाणे महानगरपालिकेच्या टेमघर जलशुद्धीकरण केंद्र येथील सबस्टेशनमधील दुरुस्तीचे काम येत्या शनिवारी करण्यात येणार आहे. यामुळे शनिवारी 6 जूनला ठाणे शहराचा पाणी पुरवठा चोवीस तास बंद रहाणार आहे.

पावसाळ्यापूर्वी सबस्टेशनमधील ट्रान्सफार्मरचे ऑईल फिल्टेशन करणे, ठाणे महानगरपालिकेच्या मुख्य जलवाहिनीवर असलेली क्रॉस कनेक्शनवर होत असलेली गळती थांबविणे, तसेच टेमघर जलशुध्दीकरण केंद्रात मुख्य जलवाहिनीवर असलेल्या झिरोवेलासिटी वॉलमधून होणारी गळती थांबविणे इत्यादी कामे करण्यात येणार आहे.

यासाठी शनिवारी सकाळी 9 ते रविवारी सकाळी 9 वाजेपर्यंत घोडबंदर रोड, पातलीपाडा, पवारनगर, कोठारी कंपाऊंड, गांधीनगर, जॉन्सन, इटरनिटी, समतानगर, ऋतूपार्क,सिध्देश्‌वर, जेल, साकेत, उथळसर, रेतीबंदर, मुंब्रा-कोळीवाडा, शैलेशनगर, संजयनगर, कळव्याचा काही भागाचा पाणी पुरवठा बंद रहाणार आहे. नागरिकांनी योग्य पाणीसाठा करुन ठेवावा असे आवाहन महापालिका पाणीपुरवठा विभागाकडून करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai: मोठा निकाल! गरोदरपणात सुनेला नोकरी सोडण्याचा सल्ला देणे ही क्रूरता नाही; मुंबई न्यायालयाचा निर्णय

मृत्यू समोर उभा…पण टीसी देवदूत ठरला; प्रवाशाचा 3 सेकंदात जीव वाचला, रेल्वे स्थानकावर थरारक प्रसंग, पाहा Video

Amravati Crime : डोक्यावर गोळी झाडून क्यूआरटी जवानाची आत्महत्या; पोलिस आयुक्तालयाच्या बेसमेंटमधील घटनेमुळे खळबळ

Mumbai News : गुटखा-हुक्का प्रकरणात विभागाची वादग्रस्त भूमिका; जप्त माल सोडण्यास परवानगी, अधिकाऱ्यांच्या भूमिकेमुळे प्रश्नचिन्ह

Nagpur News : महिलेच्या पोटातून काढला १३ किलो वजनाचा फुटबॉलच्या आकाराचा ट्यूमर

SCROLL FOR NEXT