mumbai sakal
मुंबई

आम्ही भाषण आणि घोषणा करण्यापलीकडे काही करू शकलो नाही - चित्रा वाघ

"हे एका माणसाचं काम नाही. मला लाज वाटते हे बोलायला. शक्ती कायदा आणार होते, त्याचं काय झालं?"

सकाळ वृत्तसेवा

मुंबई: साकीनाका (Sakinaka) बलात्कार पीडितेच्या मृत्यूनंतर (sakinaka rape case) भाजपाच्या महिला उपाध्यक्ष चित्रा वाघ (Chitra wagh) यांनी संताप व्यक्त केला आहे. "हा आमचा दोष आहे. आम्ही भाषण आणि घोषणा करण्यापलीकडे काही करू शकलो नाही. आम्ही कोणाला वाचवू शकत नाही" अशा शब्दात चित्रा वाघ यांनी संताप व्यक्त केला आहे.

"ज्या प्रमाणे अत्याचार झाला हे एका माणसाचं काम नाही. मला लाज वाटते हे बोलायला. शक्ती कायदा आणार होते, त्याचं काय झालं?" असा सवाल चित्रा वाघ यांनी विचारला आहे. "काय करतय हे सरकार. सरकारने यावर उत्तर द्यायला हवं. तुम्हाला हे दिसत नाही का? कायदा व सुव्यवस्थेचे इतके धिंडवडे निघाले आहेत" असे चित्रा वाघ म्हणाल्या.

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्या वक्तव्यावर त्या म्हणाल्या की, "पुरुषांची मानसिकता निष्ठूर बनत चालली आहे. मग ते बदलण्याचं काम कोणाचं आहे? सरकार म्हणून तुमची काही जबाबदारी आहे की नाही? मानसिकता बदलण्यासाठी आम्ही तुमच्या सोबत आहोत पण तुम्ही काय करताय?" असा सवाल त्यांनी विचारला.

गुन्ह्याची वेळ

८ च्या सुमारास ही महिला साकीनाका येथील बहिणीच्या घरी गणपती येणार असल्याने त्याच्या दर्शनासाठी घराबाहेर पडली.

घरातल्यांकडून रात्री बाहेर पडण्यास विरोध असतानाही तिने ऐकले नाही.

मध्यरात्री २ :१५ गुरूवारी च्या सुमारास महिलेचं आरोपी मोहन चौहान याच्यासोबत एस जे स्टुडिओ बाहेर वाद झाला.

मध्यरात्री २:३० च्या सुमारास आरोपीने चाकूच्या धाकावर पीडित महिलेसोबत जबरदस्ती करण्यास सुरूवात केली.

रस्त्यावरील विजेच्याखांबावरील लाईट बंद असल्यानेअंधाराचा फायदा घेत आरोपीने हे अत्याचार केले.रात्रीची वेळ असल्याने रस्त्यावरही कुणी नव्हतं

मध्यरात्री २:५५ वा महिला ऐकत नाही म्हणून मोहनने तिला मारहाण केली व तिला टेम्पोत ढकललं

रात्री २:४५ मिनिटांत आरोपीने महिलेवर अनैसर्गिक अत्याचार केले.

मध्यरात्री २:५० च्या सुमारास आरोपीने अत्याचार केल्यानंतर महिलेवर राग अनावर झाल्याने आरोपीने तिक्ष्ण हत्याराने महिलेच्या गुप्तांगावर जखमा केल्या

महिला रक्ताच्या थारोळ्यात टेम्पोत पडलेली असताना आरोपीने ३ वा पळ काढला

मदतीसाठी महिला आरडा ओरड करत असल्याचा आवाज रात्रपाळीवर असलेल्या सुरक्षा रक्षकाने ऐकून ३:०० वा. पोलिस नियंत्रण कक्षाला कळवले.

३.१५ मिनिटांनी पोलिस घटनास्थळी दाखल झाले

३:२० रुग्णवाहिकेची वाट न पाहता पोलिसांनी तिला टेम्पोतूनच राजावाडी रुग्णालयात नेले

४ ते ५ च्या सुमारात पोलिसांनी गुप्त माहितीदाराच्या आधारे मोहनला परिसरातूनच ताब्यात घेतले.

शुक्रवारी दुपारी १ वा १३ मिनिटांनी गुन्हा दखल करून पोलिसांनीमोहनला अटक केली

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: पटकन् मोबाईल चेक करा, लाडक्या बहिणींचे पैसे आले; किती हप्ते जमा?

Kannad Farmers Protest : मका नोंदणी होऊन महिना उलटला तरी खरेदी नाही; शेतकऱ्यांचा १२ जानेवारीपासून धरणे आंदोलनाचा इशारा!

Latest Marathi News Update : छत्रपती संभाजीनगर, मिरा-भाईंदरमध्ये शिवसेनेचे फसवणूक - सरनाईकांचा भाजपवर आरोप

Kannad Green Education: खातखेडच्या जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांनी फुलवली भाजीपाला परसबाग; प्रत्यक्ष शिक्षणाचा आदर्श उपक्रम

Virar News : नालासोपाऱ्यात ऐन निवडणुकीच्या तोंडावर पोलिसाचे पिस्तुल चोरीला; आमदाराच्या अंगरक्षकाच्या निष्काळजीपणामुळे खळबळ!

SCROLL FOR NEXT