amit thackeray esakal
मुंबई

Amit Thackeray: "आपण लवकरच सत्तेत असू"; अमित ठाकरेंनी मनसेच्या कामगार मेळाव्यात व्यक्त केला विश्वास

कामगार दिनानिमित्त मनसेच्या कामगार सेनेचा मेळावा मुंबईत पार पडला.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : मनसे लवकरच सत्तेत येईल, त्यानंतर मनसेच्या नेत्यांची सर्व काम पूर्ण होतील, असा विश्वास मनसे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी व्यक्त केला आहे. मनसेच्या कामगार सेनेचा मेळावा मुंबईत पार पडला यावेळी ते बोलत होते. (We will be in power soon Amit Thackeray expressed his confidence in MNS workers meeting)

अमित ठाकरे म्हणाले, माझ्यामुळं काहीही झालेलं नाही तुम्ही उगाचं माझं नाव घेत आहात, सर्व कष्ट तुमचेच आहेत. मी इथं केवळ मनसेच्या कामगार सेनेची ताकद पहायला आलो आहे. तुम्ही म्हणता की आपली केवळ ५० टक्केच काम होतात. पण काळजी करु नका लवकरच आपण सत्तेत असून त्यानंतर आपली १०० टक्के कामं पूर्ण होतील.

दरम्यान, शर्मिला ठाकरे म्हणाल्या सगळीकडं कामगार कपात सुरु आहे. यामध्ये तुम्ही कामगारांना न्याय देत आहात. तुमच्या कामाचं कौतूक करण्यासाठी मी इथं आले आहे, पण पुढच्या वर्षी मी नसणार. कारण पुढच्यावेळी हा माईक अमितच्या हातात असला पाहिजे, कारण आपली टीम तरुण आहे. तुम्ही सर्वांनी चांगलं काम केलं आहे, अशा शब्दांत त्यांनी कामगार सेनेच्या पदाधिकाऱ्यांना संबोधित केलं.

यावेळी बाळा नांदगावकर यांनी महाराष्ट्रातील राजकारणावर भाष्य करताना राज्यात सध्या कुस्त्या सुरु आहेत. यामध्ये उद्धव ठाकरेंची एकनाथ शिंदेंसोबत आणि फडणवीसांसोबत कुस्ती सुरु आहे, संजय राऊत विरुद्ध नितेश राणे, पवारांची घरातच कुस्ती सुरुए. त्यामुळं कोण एकत्र कोण विरोधात हे कळेनासं झालं आहे. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मेळाव्याला अनुपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sugar Price Hike Maharashtra : साखरेचे भाव क्विंटलमागे 900 रुपयांनी घसरले; तरीही किरकोळ बाजारात दर 67 रुपयांवर, फायदा साठेबाजांचाच?

कोकण आपलोच आसा! सनई चौघडे मालिकेची टीम पोहचली कणकवलीत, फोटो पाहिलेत का?

MPSC Paper Leak: परीक्षा झाली, मुलाखतीही झाल्या; मग MPSC ने संपूर्ण भरतीच का रद्द केली? पेपरफुटीचा मुद्दा पुन्हा चर्चेत

Latest Marathi News Live Update : टीम कुक ‘ॲपल’ची धुरा सोडणार

Kolhapur Gender Determination Case: गर्भलिंग निदानप्रकरणी ‘एस.पी. टोळी’ला मोका; राज्यातील पहिलीच कारवाई; ११ जणांवर बडगा

SCROLL FOR NEXT