Mumbai Local Train
Mumbai Local Train sakal media
मुंबई

जोपर्यंत 70 टक्के लसीकरण नाही, तोपर्यंत लोकल प्रवास नाही - मुंबई पालकमंत्री

कुलदीप घायवट

मुंबई: सर्वसामान्य प्रवाशांना लोकल प्रवास (local journey) खुला करण्याची मागणी जोर धरत आहे. तर, कोरोना लसीचे (vaccination) दोन डोस घेतल्यांना त्वरीत लोकल प्रवास खुला करण्याची मागणी केली जात आहे. मात्र, जोपर्यंत 70 टक्के लसीकरण होत नाही, तोपर्यंत लोकल प्रवास खुला होणार नाही. मुंबईसह इतर लगतच्या शहरांमध्येही (Mumbai neighbouring citys) 70 टक्के लसीकरण होणे आवश्यक असल्याची माहिती मुंबई शहराचे पालकमंत्री अस्लम शेख (aslam shiekh) यांनी दिली. (We will not start mumbai local until 70 percent vaccination completed mumbai guadian minister dmp82)

मागील तीन महिन्यांपासून लोकल सेवा बंद असल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. रोजगाराची चिंता, मुलांच्या शिक्षणांचा खर्च, आरोग्य खर्च, घरातील दैनंदिन खर्च आणि त्यात वाढलेला प्रवासी खर्च हे सर्व सांभाळताना सर्वसामान्यांची तारेवरची कसरत होत आहे. पेट्रोलने शंभरी गाठल्याने खासगी वाहने वापरणे गैरसोयीचे झाले आहे. परिणामी, लोकल प्रवास खुला करण्याची मागणी केली जात आहे.

ज्यावेळी कोरोनाची संख्या वाढली होती. त्यावेळी सर्वसामान्य प्रवाशांसाठी लोकल प्रवास बंद केला, हे सर्वसामान्य प्रवाशांनी मान्य केले. मात्र, आता मुंबईत कोरोनाची रुग्ण संख्या कमी होत आहे. त्यामुळे लोकल सेवा सुरू करणे आवश्यक आहे, अशी मागणी रेल्वे प्रवासी संघटनेद्वारे केली आहे. मात्र, 60 ते 70 टक्के लसीकरण झाल्यास लोकल सेवा सुरू केली जाईल, असे शेख यांनी स्पष्ट केले आहे.

मुंबईतील नागरिकांचे 50 टक्के लसीकरण होत नाही. तोपर्यंत लोकल सेवा सुरू करणे शक्य नाही, असे मे महिन्याच्या अखेरीस अस्लम शेख म्हणाले होते. त्यानंतर आता 60 ते 70 टक्के लसीकरण होण्याची वाट पाहावी लागणार आहे. सध्या अनेक ठिकाणी लसीचा तुटवडा जाणवत आहे. अनेक नागरिकांमध्ये लसीविषयी संभ्रम आहे. घरोघरी लसीकरण सुविधा अद्याप सर्वत्र सुरू झाली नाही. त्यामुळे मुंबई महानगरातील सर्वसामान्य प्रवाशांना लोकल प्रवासासाठी किती वेळ लागेल ? 70 टक्के लसीकरण पूर्ण झाल्यानंतर खरंच लोकल प्रवास खुला केला जाणार की कोरोनाची तिसरी लाट किंवा अन्य कारणे पुढे आणली जातील? सर्वसामान्य प्रवाशांना लोकल प्रवासाची मुभा लवकरात लवकर द्या. कोरोनाचे दोन लसीचे डोस घेतल्यांना प्राधान्याने लोकल प्रवास करण्याची परवागनी द्या, ही मागणी अद्याप पूर्ण झाली नाही. लोकल प्रवास बंदीमुळे, अनेकांच्या चूली पेटणे बंद झाले आहे, असे मत उपनगरीय रेल्वे प्रवासी एकता संस्थेचे (महासंघ) अध्यक्ष नंदकुमार देशमुख यांनी व्यक्त केले.

मुंबईत पहिला डोस घेणारे 57.63 टक्के

दुसरा डोस घेणारे 17.30 टक्के

ठाणे पहिला डोस घेणारे 31.93 टक्के

दुसरा डोस घेणारे 10.98 टक्के

नवी मुंबई पहिला डोस घेणारे 58.26 टक्के

दुसरा डोस घेणारे 15 टक्के

कल्याण-डोंबिवली पहिला डोस घेणारे 24.62 टक्के

दुसरा डोस घेणारे 7.78 टक्के

वसई-विरार पहिला डोस घेणारे 10.08 टक्के

दुसरा डोस घेणारे 2.91 टक्के

मिरा-भाईंदर पहिला डोस घेणारे 31.30 टक्के

दुसरा डोस घेणारे 13.17 टक्के

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Poonch Attack 2024: पुंछ हल्ल्यामागे पाकिस्तानची संघटनेचा हात, तीन ते चार दहशतवाद्यांनी...

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 06 मे 2024

Women’s T20 World Cup: स्कॉटलँडने रचला इतिहास, वर्ल्ड कपचं पहिल्यांदाच मिळवलं तिकीट; श्रीलंकाही ठरले पात्र

Sharad Pawar : बारामतीकरांना धक्का अशक्य;निवडणुकीची अमेरिकेतही उत्सुकता

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

SCROLL FOR NEXT