मुंबई

मुंबईत 'वीकेंड लॉकडाऊन'मध्ये किती जणांवर झाली कारवाई?

सकाळ डिजिटल टीम

मुंबई: वीकेंड लॉकडाऊनमध्ये नियम तोडल्याप्रकरणी मुंबईत दोन दिवसांच्या कालावधीत एकूण 427 जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले. वीकेंड लॉकडाऊनसाठी मुंबईतील विविध भागात नाकाबंदी करण्यात आली होती. त्यापू्र्वी पाच दिवसात नियम भंगाचे 123 गुन्हे दाखल करण्यात आले होते. पण वीकेंड लॉकडाऊनच्या दोन दिवसांत मुंबईत 427 जणांना पोलिसांच्या लाठ्यांचा सामना करावा लागला. शनिवारी 226 तर रविवारी 201 जणांविरोधात नियमभंगाचे गुन्हे दाखल करण्यात आले. त्यातील अनुक्रमे 155 व 166 जणांना अटक करून जामिनावर सोडण्यात आले. तर 95 जणांना नोटीस देऊन सोडण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

मुंबई पोलिस आयुक्त हेमंत नगराळे यांनी लॉकडाऊनपूर्वी पोलिसांशी संपर्क साधून संचारबंदी काळात नागरिकांशी सौजन्याने वागा, कोणाला उठाबशा काढायला लावू नका, कोणावर लाठीही उगारू नका, अशा सक्त सूचना दिल्या होत्या. त्यानुसार पोलिसांनी लाठीचार्ज वगैरे सारखे प्रकार केले नाहीत. शहरात दीडशेहून अधिक ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली होती. पोलिसांच्या साप्ताहिक सुट्या रद्द करण्यात आल्या होत्या. नाकाबंदीच्या वेळी संशयित गाड्यांची तपासणी करण्यात येत होती. काही ठिकाणी दुकानदारांनी दुकाने सुरू ठेवली होती. त्यांच्यावर काही ठिकाणी कारवाई करण्यात आली. रविवारीही असाच कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

दोन दिवसात दाखल करण्यात आलेले हे गुन्हे भारतीय दंड विधान कलम 188 अंतर्गत आहेत. त्याशिवाय मास्क न वापरलेल्या 40 जणांवर रविवारी कारवाई करण्यात आली. याशिवाय सार्वजनिक ठिकाणी गर्दी केल्याप्रकरणी 19 गुन्हे दाखल करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Santosh Deshmukh Case: ऐनवेळी प्लॅन बदलला! संतोष देशमुख प्रकरणातील आरोपीला १० कमांडोंच्या गराड्यात गावात नेलं अन्...

स्टार प्रवाहवरील अभिनेत्रीची झी मराठीच्या 'सनई चौघडे' मध्ये एंट्री; पहिल्यांदा साकारणार आईची भूमिका

Pre Sleep Habits: दिवसभराचा थकवा आणि चिडचिड घालवायची असेल, तर झोपण्यापूर्वी 'या' गोष्टींना करा कायमचा टाटा!

Latest Marathi News Live Update: ५०० चौरस फुटापर्यंतच्या सदनिकेचा करमाफीचा प्रस्ताव फेटाळला

LPG Gas: उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून आलोय, मला सिलिंडर द्या...; अधिकारी असल्याचे भासवले; एजन्सीमधून सिलिंडर घेऊन पळून गेले

SCROLL FOR NEXT