मुंबई

शाब्बास मुंबई! शहरातील कोरोना रूग्ण दुप्पटीचा कालावधी अडीचशे पार

मिलिंद तांबे

मुंबई : रुग्ण दुपाटीचा कालावधी अडीचशे पार म्हणजे 255 वर गेला असून एकूण  24 विभागांपैकी तब्बल 21 विभागात रूग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 200 दिवसांपेक्षा अधिक दिवसांवर गेला आहे. यापैकी 4 विभागात 400 पेक्षा अधिक, 5 विभागात 300 पेक्षा अधिक  तर  12 विभागात 200 पेक्षा अधिक दिवसांचा रूग्ण दुप्पटीचा कालावधी गाठलेला आहे  .

मुंबईतील रूग्ण वाढीचा सरासरी दर आणखी कमी होऊन आता 0.27% पर्यंत खाली आला आहे. यातही 24 विभागांपैकी 14 विभागात रूग्ण वाढीचा सरासरी दर 0.27% या सरासरी  पेक्षा कमी आहे.  

मुंबईत 574 नवे रुग्ण , तर 15 मृत्यू

आज 574 नवे रुग्ण सापडले असून मुंबईतील एकूण रुग्णसंख्या 2,69,704 झाली आहे. तर आज 15 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा 10,570 वर पोचला आहे. आज 586 रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत 2,45,245 रूग्ण बरे होऊन घरी गेले. रुग्ण बरे होण्याचा दर हा 91 टक्के इतका झाला आहे. 14 नोव्हेंबर पर्यंत एकूण 16,85,287 कोविड चाचण्या करण्यात आल्या.
मुंबईत आज नोंद झालेल्या 15 मृत्यूंपैकी 11 जणांना दीर्घकालीन आजार होते. आजच्या एकूण मृत्यू झालेल्या व्यक्तींमध्ये 10 पुरुष तर 5  महिलांचा समावेश होता. एकूण मृत झालेल्या 15 रुग्णांपैकी 2 रुग्ण 40 ते 60 वर्षा दरम्यान होते तर 13 रुग्णांचे वय 60 वर्षा वर होते. 

मुंबईत 467 इमारती आणि झोपडपट्टया कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आले असून सक्रिय सीलबंद इमारतींची संख्या 5,707 इतकी आहे. बाधित रूग्णांच्या संपर्कात येणा-या व्यक्तींची संख्या दिवसेंदिवस वाढत असून गेल्या 24 तासात बाधित रुग्णांच्या संपर्कात 3,735 अति जोखमीचे व्यक्ती आले आहेत. त्यामुळे कोविड कोळजी केंद्रात दाखल कऱण्यात येणा-यांची संख्या देखील वाढत असून आज कोविड काळजी केंद्र 1 मध्ये 421 अति जोखमीचे संपर्क उपचारासाठी दाखल करण्यात आले. 

.........

महत्त्वाचे टप्पे..

100 दिवस   20 ऑक्टोबर 

126 दिवस    24 ऑक्टोबर 

150 दिवस     29 ऑक्टोबर

208 दिवस      05 नोव्हेंबर 

255 दिवस      14 नोव्हेंबर

......... 

मुंबईत रूग्ण दुप्पट होण्याचा सर्वात जास्त  कालावधी असलेले 5 विभाग..

इ                   482 दिवस 

एफ दक्षिण      466 दिवस 

सी                  444 दिवस

जी उत्तर          428 दिवस 

बी                   392 दिवस 

मुंबईत रूग्ण दुप्पट होण्याचा  सर्वात कमी कालावधी असलेले 5  विभाग

आर मध्य        209 दिवस 

के पश्चिम         200 दिवस  

एच पश्चिम       191दिवस

पी   दक्षिण       179 दिवस 

आर दक्षिण      174 दिवस

Well done Mumbai The duration of the corona patient doubling in the city exceeded two hundred and fifty

------------------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harshvardhan Sadgir Retire: महाराष्ट्र केसरीचा किताब जिंकताच हर्षवर्धनची निवृत्तीची घोषणा; सरकारला ठरवलं जबाबदार

Ashok Kharat: पोलिसांनी अशोक खरातचा माज उतरवला! अखेर रडत रडत 'नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला' असल्याचा म्हणाला, पाहा व्हिडिओ

Maharashtra Kesari Prize: विजेता हर्षवर्धन सदगीरसह उपविजेता महेंद्र गायकवाडही मालामाल; पाहा कोणाला काय मिळालं बक्षीस

Rohit Pawar: महाराष्ट्र महिला आयोगाची कमान कोणाकडे? रोहित पवारांनी ४ नावे सुचवली; महायुतीची डोकेदुखी वाढवली!

Maharashtra Kesari: नाशिकचा हर्षवर्धन सदगीर 'डबल महाराष्ट्र केसरी'! महेंद्र गायकवाडला चितपट करत पटकावली मानाची गदा

SCROLL FOR NEXT