सुसज्ज मीनाताई ठाकरे रुग्णालयात डॉक्‍टरच नाही!  
मुंबई

सुसज्ज मीनाताई ठाकरे रुग्णालयात डॉक्‍टरच नाही!

सकाळ वृत्तसेवा

नवी मुंबई : नेरूळ येथील मीनाताई ठाकरे रुग्णालय सर्व सोई-सुविधांनी सज्ज असल्याचा दावा पालिकेमार्फत केला जातो; मात्र असे असले तरी गरजेच्या वेळी डॉक्‍टर उपलब्ध होत नसल्याने, या ठिकाणी येणाऱ्या रुग्णांची परवड होत आहे. या सात मजली रुग्णालयाचा डामडौल पाहता "बडा घर पोकळ वासा' असे म्हणण्याची वेळ रुग्णांवर आली आहे. 

गेल्या वर्षी ऑगस्टनंतर झालेल्या डॉक्‍टरांच्या भरती प्रक्रियेत मीनाताई ठाकरे रुग्णालयातील रिक्त पदे भरली जातील, तंत्रज्ञ उपलब्ध केले जातील, असा दावा आरोग्य विभागाकडून केला जात होता. तसेच सोनोग्राफीसारख्या इतर अत्यावश्‍यक सुविधा उपलब्ध करत रुग्णालय सुरळीत सुरू झाल्याचे भासवण्यातही आले. मात्र, अजूनही पुरेशा कर्मचाऱ्यांच्या अभावामुळे येथे येणाऱ्या रुग्णांची, गर्भवती महिलांची तासन्‌ तास रखडपट्टी होत आहे. या रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल झालेल्या एका गर्भवती महिलेला सोनोग्राफीसाठी डॉक्‍टर उपलब्ध नसल्याने व रक्तचाचणी होत नसल्याने रात्रीच्या सुमारास खासगी रुग्णालय गाठावे लागले; तर नेरूळच्या स्थानिक आरती चौहान यांनादेखील रुग्णालयात पुरेसा कर्मचारीवर्ग उपलब्ध नसल्याने लसीकरणासाठी अर्धा तास अधिक वाट पाहावी लागली. याबाबत चौकशी केली असता रुग्णालयात पुरेसे कर्मचारी नसल्याची बाब समोर आली आहे. नेरूळ, सीवूडस व परिसरातील गरजू, गोरगरीब रुग्णांकरिता पालिकेची रुग्णालये संजीवनी ठरू शकतात; मात्र सोई-सुविधा उपलब्ध असतानाही कर्मचारीवर्ग नसल्याने रुग्णांची परवड होत असल्याचे मत येथे उपचारासाठी येणारे रुग्ण व्यक्त करत आहेत. 

एका ठिकाणाहून प्राण्यांची सुटका करताना कुत्र्याचा दात लागल्याने सावधगिरी म्हणून रेबीजची लस घेण्याकरता मीनाताई ठाकरे रुग्णालयात गेले होते. मात्र, तेथे अर्धा तास वाट पाहावी लागली. कर्तव्यावर असलेली परिचारिका फिरतीवर असल्याने तिला यायला वेळ लागला. 
- आरती चौहान, नेरूळ. 

रुग्णालयात सर्व सोई-सुविधा उपलब्ध आहेत. पुरेसे कर्मचारीही आहेत. केवळ रक्ततपासणी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत केली जाते. रात्रीच्या वेळेस सोनोग्राफी करण्यासाठी डॉक्‍टरांना बोलावून घेतले जाते. त्यांनी येणे अपेक्षित आहे. एखाद्या वेळेमध्ये डॉक्‍टर उपलब्ध झाले नसतील तर त्याबाबत प्रथम माहिती करून घ्यावी लागेल. 
- डॉ. सविता रामरखियानी, वैद्यकीय अधीक्षक 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis : दिवाळीच्या दिवशी मुख्यमंत्री दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर; खोरी जलसिंचन प्रकल्पाचीही करणार पाहणी

Andheri Fire: मुंबईतील उंच इमारतीत आगीचा थरार! १७व्या मजल्यावरील घराला भीषण आग, एकाचा दुर्दैवी मृत्यू

डोक्यावर ग्लास ठेवून माधुरी दीक्षितचा बॉबी देओलसारखा डान्स! 'जमाल कुडु'च्या तालावर थिरकली धकधक गर्ल, Video Viral

Latest Marathi News Live Update: E 20 ला मंजुरी देण्याचा केंद्राचा निर्णय वैज्ञानिक पुरावे आणि तांत्रिक मूल्यांकनांवर आधारित- सुरेश गोपी

Sugarcane Workers: ऐन दिवाळीतही ऊसतोड मजुरांच्या हातात कोयता; पोटाची खळगी भरण्यासाठी जीव धोक्यात घालून कष्ट

SCROLL FOR NEXT