File Photo 
मुंबई

पिशवी आणायला गेली अन्‌ स्वप्नांची राखरांगोळी झाली...

नीलेश मोरे

मुंबई : वडील अंथरुणाला खिळल्यावर 25 वर्षीय आरती जैस्वालने भावासोबत कुटुंबाची जबाबदारी स्वीकारली. आयुष्यभर भाड्याच्या घरात राहाणाऱ्या आपल्या कुटुंबासाठी मुंबईत स्वतःचे घर घेण्याचे आरतीचे स्वप्न होते. मात्र, शुक्रवारी साकीनाका येथे लागलेल्या आगीत आरती जैस्वालचा होरपळून मृत्यू झाला. आग लागल्याचे कळताच आरती सहकाऱ्यांबरोबर कार्यालयाबाहेर पडली; मात्र कार्यालयात राहिलेली पिशवी आणण्यासाठी परत गेली ती बाहेर आलीच नाही.

लालजी जैस्वाल यांचे रेशनचे दुकान होते. काही वर्षांपूर्वी आजारी पडल्याने त्यांना दुकान बंद करावे लागले. त्यामुळे कुटुंबाची जबाबदारी आरती आणि तिचा भाऊ प्रदीप याने स्वीकारली. वडिलांच्या औषधोपचाराचा खर्च भागवण्यासाठी आरतीने शिक्षण सोडून नोकरीची वाट धरली. साकीनाका येथील मनन क्रिएशन या कंपनीत आरती तीन वर्षांपासून काम करत होती.

गुरुवारी सायंकाळी नजीकच्या थिनर कंपनीला आग लागल्याचे कळताच आरती कार्यालयातील सहकाऱ्यांसोबत बाहेर पडली. मात्र, विसरलेली पिशवी परत आणण्यासाठी आरती कार्यालयात परत गेली. तेवढ्यात आगीने रौद्ररूप धारण करत तिच्या कार्यालयापर्यंत आली. अशाही अवस्थेत ती बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होती; मात्र तेवढ्यात वाटेत लोखंडी खांब पडल्याने तिला बाहेर पडणे अशक्‍य झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. त्यामुळे मुंबईत स्वत:चे घर घेण्याचे आरतीचे स्वप्न आगीच्या ज्वाळांसह खाक झाले. 

आरती आणि तिचा भाऊ प्रदीपवर कुटुंबाची जबाबदारी होती. वडिलांच्या औषधोपचाराचा खर्च आरती करत होती. आता आरतीच्या जाण्याने कुटुंबाचा आधारच निघून गेला आहे. दरवेळी आग कशी काय लागते? प्रशासन दुर्घटनेची सखोल चौकशी का करत नाही ? वारंवार होणाऱ्या दुर्घटनांमुळे आतातरी शासनाने रासायनिक कंपन्या तिथून हटवाव्यात. आरतीच्या कुटुंबाला शासनाने मदत करावी. 
- रवी कुमार,
मृत आरतीचे मामा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US-Israel-Iran War: इस्राईलचं सैन्य लेबनॉनमध्ये घुसलं! ‘हिज्बुल्लाह’ विरोधात आक्रमक भूमिका; नागरिकांना स्थलांतराचे आवाहन

Pune News : भांडार विभाग साहित्य खरेदी प्रकरणातील आठ अधिकाऱ्यांकडून खुलासा करण्यास टाळाटाळ

Iran america Israel war : इराण-अमेरिका-इस्त्राईल संघर्ष तिव्र होण्याची शक्यता; मध्यपूर्वेतील युद्धाचा भडका उडण्याची चिन्हे

Iran-Israel war: 'आता ती वेळ आलीच...', शहबाज-मुनीर यांच्याविरोधात पाकिस्तानमध्ये जनक्षोभ, २६ जणांचा मृत्यू

होळीच्या रंगांवर काळी सावली; नागपूरमध्ये किरकोळ वादातून तरुणाचा मृत्यू, गाडी साईडने चालव म्हणणं जीवावर बेतलं

SCROLL FOR NEXT