Western Railway record earnings of Rs 68 crore in single day mumbai
Western Railway record earnings of Rs 68 crore in single day mumbai sakal
मुंबई

मुंबई : पश्चिम रेल्वेचा विक्रम एका दिवसांत ६८.४२ कोटी रुपयांची कमाई

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : पश्चिम रेल्वेने मागील तीन महिन्यात ४ हजार ४८५ कोटीं रुपयांची कमाई केली आहे. मागील वर्षाच्या तुलनेत सुमारे यंदा ६७ टक्यांनी महसूलात वाढ झाली आहे. तर, गुरुवारी एका दिवसात ६८.४२ कोटी रुपयांची कमाई करत पश्चिम रेल्वेने आपल्या नावाने एक नवीन विक्रम नोंदविला आहे. पश्चिम रेल्वेने १ एप्रिल २०२२ ते २३ जून २०२२ या कालावधीत मागील वर्षाच्या तुलनेत सुमारे यंदा ६७ टक्यांनी महसुलात वाढ नोंदवून ४ हजार ४८५ कोटी रुपयांची कमाई केली आहे. यामध्ये प्रवासी वाहतुकीतून १ हजार २५६ कोटीं तर मालवाहतुकीतून ३ हजार ९८ कोटींचा महसूल मिळाला आहे.

पार्सल आणि लगेजमधून ७१. ८१ कोटी प्राप्त झाले आहे. याशिवाय तिकीट तपासणीतून ५८.६९ कोटी रुपयांचा विक्रमी महसूल प्राप्त झाला. पश्चिम रेल्वेने गेल्या तीन महिन्यात १४१ पार्सल रेल्वे गाड्यातून ७५ हजार टनापेक्षा अधिक वस्तूंची वाहतूक केली आहे. यामध्ये कृषी उत्पादने, औषधे, वैद्यकीय उपकरणे, मासे इत्यादींचा समावेश आहे. ४७ दूध विशेष गाड्या चालवल्या आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या वाहतुकीसाठी २७०० टन पेक्षा जास्त भार असलेल्या १३ विशेष पार्सल गाड्याही चालवण्यात आल्या.

याव्यतिरिक्त, सुमारे ३२ हजार ५०० टन वाहतूक करणारे ६२ इंडेंटेड रेक आणि सुमारे १८०० टन वाहतूक करणारे ८ इंडेंटेड एनएमजी रेक देखील चालविण्यात आलेल्या आहे. शेतकर्‍यांना त्यांच्या उत्पादनासाठी नवीन बाजारपेठ शोधण्यात आणि त्यांच्या किफायतशीर आणि जलद वाहतुकीसाठी, ३ हजार ४०० टनांहून अधिक भार असलेल्या ११ किसान रेल देखील या काळात चालवण्यात आल्या आहेत,अशी माहिती पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT