whale fish sakal media
मुंबई

व्हेल माशांच्या उलटीच्या तस्करीप्रकरणी दोघांना अटक

सहा कोटीची ५ किलो ९१० ग्रॅम व्हेल माशाची उलटी जप्त

राजू परुळेकर

मुंबई : शासनाने बंदी घातलेल्या व्हेल माशांच्या उलटीच्या (whale ambergris) तस्करीप्रकरणी दोघांना घाटकोपर (Ghatkopar) युनिटच्या गुन्हे शाखेच्या (crime branch) अधिकार्‍यांनी अटक (Arrested) केली. योगेश रमेश चव्हाण आणि सुरेंद्र छोटो साव अशी या दोघांची नावे आहेत. या दोघांकडून पोलिसांनी सुमारे सहा कोटी रुपयांची ५ किलो ९१० ग्रॅम वजनाची व्हेल माशाची उलटी जप्त केली आहे. अटकेनंतर या दोघांनाही लोकल कोर्टाने (court) पोलीस कोठडी सुनावली आहे.

व्हेल माश्याची उलटी समुद्रात तरंगते सोने असून हा पदार्थ स्पर्म व्हेल माशांच्या पोटात तयार होतो, त्याचा वापर अतिउच्च प्रतीचे परफ्युम, औषधांसह सिगारेट, मद्य आणि पदार्थांमध्ये स्वाद वाढविण्यासाठी केला जातो. शासनाने व्हेल माशांच्या उलटीची तस्करीवर बंदी घातली आहे. असे असताना काहीजण या उलटीची विक्रीसाठी भांडुप परिसरात येणार असल्याची माहिती घाटकोपर युनिटच्या अधिकार्‍यांना मिळाली होती. या माहितीनंतर प्रभारी पोलीस निरीक्षक मनिष श्रीधनकर यांच्यासह सुधीर जाधव, आनंद बागडे व अन्य पोलीस पथकाने भांडुप येथील कांजूरमार्ग-भांडुप सर्व्हिस रोड, पूर्व दुतग्रती महामार्गावरील भांडुप पादचारी पुलाजवळ साध्या वेशात पाळत ठेवली होती.

बुधवारी सायंकाळी सव्वासहा वाजता तिथे दोन तरुण आले होते. या दोघांची हालचाल संशयास्पद वाटताच त्यांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्यांच्याकडील काळ्या रंगाच्या सॅकची तपासणी केल्यानंतर त्यात पोलिसांना ५ किलो ९१० ग्रॅम वजनाचे व्हेल माशांची उलटी सापडली. या उलटीची किंमत सुमारे सहा कोटी रुपये इतकी आहे. ही उलटी जप्त केल्यानंतर पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली.

चौकशीत त्यांची नावे योगेश चव्हाण आणि सुरेंद्र साव असल्याचे उघडकीस आले. ते दोघेही मुलुंड आणि मालाडचे रहिवाशी आहेत. याच गुन्ह्यांत ते दोघेही सध्या पोलीस कोठडीत असून त्यांची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. त्यांनी व्हेल माशांची उलटी कोठून आणली, ती उलटी ते कोणाला विकणार होते. या गुन्ह्यांत त्यांचे इतर काही सहकारी आहेत का, यापूर्वीही त्यांनी व्हेल माशांची उलटीची तस्करी केली आहे का याचा आता पोलीस तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitish Kumar Takes Oath as Bihar Chief Minister : नितीशकुमार दहाव्यांदा झाले बिहारचे मुख्यमंत्री; पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत घेतली शपथ!

Maharashtra politics: मूळ मुख्यमंत्री अमित शहा! देवेंद्र फडणवीस शॅडो CM, शिंदेंच्या अचानक दिल्ली दौऱ्यावर सवाल

Shraddha Bhosale : कुटुंब मूळचे गुजरातचे, जन्म मुंबईत, शिक्षण अमेरिकेत अन् सासर कोकणात; कोण आहेत श्रद्धा सावंत भोसले? भाजपनं दिलीय उमेदवारी

‘कसाब बिर्याणी मागतोय’ हा ‘माझाच फंडा’! खासदार ॲड. उज्ज्वल निकम; प्रकट मुलाखतीत उलगडले अनेक किस्से..

Latest Marathi News Update LIVE : बिहारमध्ये पुन्हा एकदा नितीशराज! पाटण्यात ऐतिहासिक शपथविधी सोहळा

SCROLL FOR NEXT