nana patole  eSakal
मुंबई

Nana Patole: पवारांच्या बैठकीत काय झालं? 'इंडिया'ची बैठक कधी? विरोधीपक्ष नेता कधी ठरणार?; पटोलेंची सविस्तर माहिती

महाविकास आघाडीच्या नेत्यांनी शरद पवार यांची भेट घेतली, या बैठकीत विविध मुद्द्यांवर चर्चा झाली.

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : महाविकास आघाडीच्या नेत्यांची शरद पवारांसोबत मुंबईत आज बैठक पार पडली. या बैठकीनंतर पत्रकार परिषद घेत नाना पटोले यांनी बैठकीत काय चर्चा झाली याची सविस्तर माहिती दिली. यावेळी इंडियाची मुंबईतील बैठक कधी होणार? तसेच विधानसभेतील विरोधीपक्ष नेता कधी ठरणार? याची माहिती त्यांनी दिली. (What happened in Sharad Pawar meeting India meeting Nana Patole gave detailed info)

पटोले म्हणाले, 15 ऑगस्टनंतर सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मुंबईत इंडियाची बैठक होईल. अनेक राज्याचे मुख्यमंत्री, नेते असे 100 हून अधिक नेते मुंबईत येणार आहेत. त्यामुळं याची पूर्व तयारी करावी लागणार आहे, त्यामुळं याला वेळ लागतो आहे. याआधी झालेल्या बंगळुरु इथल्या बैठकीचा अनुभव यावेळी त्यांनी सांगितला. तसेच महाराष्ट्रात मुंबईत होणाऱ्या बैठक व्यवस्थित पार पडेल असंही ते म्हणाले.

उद्धव ठाकरे असणार इंडियाच्या बैठकीचे आयोजक

मुंबईतल्या इंडियाच्या बैठकीचे आयोजक उद्धव ठाकरे असणार आहेत. फोनवरुन त्यांच्याशी याबाबत बोलणं झालं आहे. यावेळी मविआतील प्रत्येक पक्षाची जबाबदारी काय असणार यावर चर्चा त्यांच्याशी चर्चा झाली. यासाठी पुढच्या शनिवारी सकाळी अकरा वाजता महाविकास आघाडीची बैठक होणार असल्याचं पटोले यांनी यावेळी सांगितलं.

पुढील आठवड्यात विरोधीपक्ष नेता ठरेल

विधी मंडळात ज्या पक्षाचे जास्त आमदार त्या पक्षाचा विरोधी पक्ष नेता होतो. त्यामुळं विरोधीपक्ष नेता काँग्रेसचा होईल. पुढच्या आठवड्यात याबाबतच चित्र स्पष्ट होईल, अशी माहिती यावेळी पटोले यांनी दिली.

जागा वाटपावर अभ्यास सुरु

5 ऑगस्टनंतर महाविकास आघाडीतील तीन्ही घटकपक्षांचे दौरे सुरु होतील. इंडियामध्ये जागा वाटप कसे करता येईल याबाबत प्रत्येक पक्ष आपला अभ्यास करत आहे. निवडणुकीला अजून वेळ आहे, त्यामुळं तोपर्यंत हे काम पूर्ण होईल. बंगळुरुच्या बैठकीत सोनिया गांधींसह सगळेच नेते होते. भाजप ज्या पद्धतीनं देश लुटत आहे. देशाला गरीब बनवत आहे, त्याविरोधात ताकदीनं लढण्याचं इंडियानं ठरवलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अग्रलेख : शोध हरवलेल्या आवाजाचा!

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 5 जुलै 2025

Latest Maharashtra News Updates : विजयी मेळाव्यानिमित्त ठाकरे बंधू येणार एकाच व्यासपीठावर, शिवसेना-मनसेचा आज भव्य मेळावा

मन, मेंदू आणि आपण

हौस ऑफ बांबू : सहासष्ट आणि नव्याण्णव..!

SCROLL FOR NEXT