Arvind More  esakal
मुंबई

Arvind More : आम्ही काम करून आम्हाला व्यासपीठावर जागा नसेल तर या पदाचा फायदा काय; अरविंद मोरे

शिवसेना शिंदे गटातील कल्याण मुरबाड जिल्हाप्रमुख अरविंद मोरे यांची नाराजी

शर्मिला वाळुंज : सकाळ वृत्तसेवा

डोंबिवली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महायुतीचे उमेदवार कपिल पाटील आणि श्रीकांत शिंदे यांच्यासाठी कल्याण येथे प्रचार सभा होणार आहे. या सभेत व्यासपीठावर आपल्याला मान दिला नाही असे सांगत शिवसैनिक अरविंद मोरे नाराज झाले आहेत. त्यांच्या राजीनामा नाट्यामुळे कल्याण लोकसभा मतदारसंघात पुन्हा एकदा शिवसेना आणि भाजपमध्ये नाराजीचे नाट्य पाहायला मिळत आहे.

बुधवारी कल्याण येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जाहीर प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेत व्यासपीठावर आपल्याला मान दिला नाही असे सांगत शिवसैनिक अरविंद मोरे यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आपण आपल्या पदाचा राजीनामा शिंदे यांच्याकडे पाठविणार असल्याचे त्यांनी तोंडी सांगितले आहे.

मोरे यांची जिल्हाप्रमुख म्हणून पक्षात नियुक्ती आहे. आमच्या हाताखाली आमदार, यांच्यासह इतर पदाधिकारी देखील काम करतात. यांना व्यासपीठावर जागा देण्यात आली. मात्र आम्ही काम करून सुद्धा आम्हाला व्यासपीठावर जागा देण्यात आली नाही. मग या पदाचा काय फायदा? मी एकनाथ शिंदे यांच्याकडे माझा राजीनामा दिला आहे असे मोरे यांनी यावेळी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Matoshree : मातोश्रीजवळ ड्रोनच्या घिरट्या, उद्धव ठाकरेंवर नजर ठेवली जातेय? मुंबई पोलिसांनी सांगितले खरं कारण

National Park Toy Train: नॅशनल पार्कमधील वनराणी कधी धावणार? ५ वर्षांपासून पर्यटक प्रतिक्षेत; महत्त्वाची माहिती समोर

'इंज्युरीनंतर मला समजलं की, स्वामी नेहमी....' स्वामी समर्थांचा अनुभव सांगताना तेजस्विनी म्हणाली...'दरवेळी ते माझ्यासोबत...'

Latest Marathi Breaking News Live: निवडणुका आल्यावर आमच्यावर आरोप होतात - अजित पवार

Kolhapur Crime : दोन चाकीच्या डिकीत पैसे ठेवून मोबाईलवर बोलत होता, एक मिनीटातचं चोराने १ लाख रुपये चोरलं, सीसीटीव्ही फुटेज समोर

SCROLL FOR NEXT