mumbai Highcourt sakal
मुंबई

HighCourt: 'माॅब लिंचिंग' रोखण्यासाठी काय उपाययोजना केल्या? न्यायालयाचे सरकारला निर्देश

Maharashtra News: चार आठवड्यांत भूमिका स्पष्ट करण्याचे न्यायालयाचे सरकारला निर्देश | Court directs government to explain stand in four weeks

सकाळ वृत्तसेवा

Mumbai News: राज्यात 'माॅब लिंचिंग'च्या (जमावाने केलेली हत्या) अनेक घटना घडत असून अशा घटना रोखण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने काही निर्देश दिले आहेत. (Supreme Court)

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार कोणत्या उपाययोजना केल्या, असा सवाल मुंबई उच्च न्यायालयाने आज (ता.४) सरकारला केला. तसेच याबाबत चार आठवड्यांत भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश शासनाला दिले.(Bombay High Court)

२४ जून २०२३ रोजी समृद्धी महामार्गावरुन नासिर कुरेशी व याचिकाकर्त्या महिलेचा पती हे दोघे कारमधून चालले होते. सायंकाळी सिन्नर-घोटी मार्गावर असताना एक बोलेरो जीप व चार ते पाच दुचाकींनी त्यांच्या कारचा पाठलाग केला.

ओव्हरटेक करून कार थांबवली आणि १४ ते १५ जणांच्या जमावाने 'जय श्री राम' बोलण्याची सक्ती करीत दोघांचे हातपाय बांधून मारहाण केली. जमावाच्या मारहाणीत नासिर हुसेन गुलाम हुसेन कुरेशी यांचा मृत्यू झाला. हत्येचा खटला जलदगतीने चालवावा व पतीच्या मृत्यूप्रकरणी भरपाई द्यावी, अशी मागणी करत कुरेशी यांच्या पत्नीने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली.

या याचिकेवर आज न्या. रेवती मोहिते-डेरे आणि न्या. मंजुषा देशपांडे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली. न्यायालयाने याचिकेची गंभीर दखल घेत माॅब लिंचिंगच्या घटना रोखण्यासंबंधी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाला अनुसरून कोणती पावले उचललीत.

याबाबत सविस्तर माहिती देण्याचे निर्देश सरकारला दिले. त्यावेळी सरकारच्या वतीने ऍड प्राजक्ता शिंदे यांनी बाजू मांडण्यासाठी वेळ मागितला. हा अवधी देत खंडपीठाने सुनावणी चार आठवड्यानंतर ठेवली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सचिन अहिर यांची बिनविरोध निवड, विरोधकांनी अर्ज का मागे घेतला? सभागृहात काय घडलं?

Mumbai Local: प्रवाशांची सुरक्षा कोणाच्या भरोशावर? मुंबई लोकलमध्ये आरपीएफ आणि जीआरपी कर्मचाऱ्यांचा तुटवडा; २,५५९ पदे रिक्त

Raj Thackeray: "ते देहविक्रीलाही तयार असतील तर..."; फुटीर लोकप्रतिनिधींवर राज ठाकरेंची टीका, अमित शाहांवर गंभीर आरोप

Sanjay Raut Statement : संजय राऊत म्हणाले 'आम्हाला आत्मचिंतनाची गरज आहे'; मूळ शिवसैनिकांवरच पक्ष उभा राहतो

Hardik Pandya Trade: हार्दिकसाठी CSKसह एकूण ७ फ्रँचायझींमध्ये चुरस; दोनच संघ ज्यांना Mumbai Indians च्या कर्णधारामध्ये नाही रस

SCROLL FOR NEXT