मुंबई

पुन्हा लॉकडाऊनच्या चर्चांनी नागरिकांच्या मनस्थितीवर कसा झालाय परिणाम? वाचा तज्ज्ञांचं मत

मिलिंद तांबे

मुंबई, ता. 2 : कोरोनाचा संसर्ग मुंबईसकट महाराष्ट्रामध्ये वाढत असून मुख्य शहरांमध्ये नाईट कर्फ्यूला सुरुवात झाली आहे. नागरिकांनी शासनाचे नियम पाळले नाहीत तर लॉकडाउन केले जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यामुळे नोकरदार तसेच छोटे व्यावसायिक धास्तावले असून त्यांना वाढत्या मानसिक ताणतणावाचा सामना करावा लागत आहे. 

चेंबूर मधील 40 वर्षीय पूजा रुपवते सध्या चेंबूरमध्ये पोळी भाजीचा स्टॉल चालवतात. मात्र पुन्हा लॉकडाऊन होईल या भीतीने त्यांना ग्रासले आहे. असे झाले तर आपण थेट रस्त्यावर येऊ असे पूजा रुपवते यांना वाटते. मी चेंबूरमधील सुभाष नगर येथे भाड्याने राहते. गेल्या वर्षी 1 मार्च रोजी मी लहान मुलांसाठी 'डे केअर' सेंटर चालवण्यासाठी जागा भाड्याने घेतली. त्यासाठी दीड लाख रुपये गुंतवले. डे केअर सेंटर सुरू होणार इतक्यात लॉकडाऊन सुरू झाल्याने ते ठप्प झाले. पैसे बुडाले. लॉकडाऊनमध्ये इतर काही काम देखील मिळाले नाही. नवरा हयात नाही, तीन मुलांची जबाबदारी माझ्यावर आहे. त्यातच आजारी पडले. त्यात खर्च झाल्याचे पूजा सांगतात. 

लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर पोळी-भाजी केंद्र सुरू केले. त्यासाठी ही 70 हजार रुपये उधार घ्यावे लागले. आता कुठे धंदा रुळावर येत असल्याचे वाटत असतांना पुन्हा एकदा कोरोना संसर्ग वाढू लागला. चेंबूरची वाटचाल तर हॉटस्पॉटच्या दिशेने सुरू आहे. त्यामुळे लॉकडाऊनची चिंता सतावू लागली आहे. रात्र रात्रभर झोप येत नाही असे पुजा रूपवते सांगतात. 

कोरोना संसर्ग वाढू लागल्याने खबरदारी म्हणून सर्व धार्मिक, राजकीय सामाजिक यात्रा, आंदोलने व मोर्चे यावर बंधने घातली आहे. गेल्या वर्षी केंद्र सरकारने लागू केलेल्या  लॉकडाउनमुळे  संपूर्ण भारताची आर्थिक स्थिती बिघडलेली असून जर खरोखरच लॉकडाउन झाले तर नागरिकांच्या मानसिक ताणतणावात वाढ होण्याची भीती वैद्यकीय क्षेत्रातून व्यक्त होत आहे.

याविषयी अधिक माहिती देताना मानसोपचार तज्ज्ञ डॉ युसूफ माचीसवाला सांगतात, "कुठल्याही संसर्गजन्य आजारात तो पसरू नये यासाठी लॉकडाऊन करणे गरजेचं असते. मात्र, या लॉकडाऊनमध्ये  मानसिक आरोग्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. कारण 80 टक्क्याहून जास्त नागरिक हे खाजगी क्षेत्रातील नोकऱ्या किंवा लहान उद्योगधंद्यांवर अवलंबून आहेत. गेल्या लॉकडाउनमध्ये अनेक नागरिकांच्या नोकऱ्या गेल्या, अनेक उद्योगधंदे बंद झाले त्यामुळे अनेक नागरिक हे मानसिक तणावात आहेत. 25 ते 40 वयोगटातील व्यक्तींमधून मानसिक तणाव अधिक आहे कारण तरुणांच्या खांद्यावर कौटुंबिक जबाबदारीचे ओझे असल्याने आपली नोकरी जाण्याची भीती त्यांना सतावत असल्याचे डॉ.  माचीसवाला यांनी सांगितले.

लॉकडाऊनच्या काळात लहान मुलं तसेच स्त्रियांवरील हिंसाचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. महिला आयोगाकडे आलेल्या तक्रारी सामान्य काळाच्या तुलनेत दुपटीने वाढल्या आहेत. कोरोनामुळे आलेली जागतिक मंदी, बंद पडलेले उद्योगधंदे, बेरोजगारी, पगारातील कपात, आर्थिक अडचणी, गरीबी, या सर्व संकटातून आपण सावरू की नाही याची भिती, दडपण, राग अशा अनेक कारणांमुळे कौटुंबिक हिंसाचार निर्माण झाला आहे.

what people of mumbai thinks when they hear word lockdown explained by psychologist

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MK Stalin Reaction : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर आता CM स्टॅलिन यांचीही आली प्रतिक्रिया; केलंय मोठं विधान!

IND vs ENG 2nd Test: भारताची ऐतिहासिक विजयाच्या दिशेने कूच! Akash Deep चा भेदक मारा, इंग्लंडची उडवली झोप

Mumbai Airport Wildlife Smuggling : खळबळजनक! मुंबई विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत तब्बल ४५ प्राणी सापडले

Central Railway: मध्य रेल्वेची ज्येष्ठांसाठी मोठी घोषणा

Rabri Devi Statement : तेजप्रताप यादव प्रकरणावर पहिल्यांदाच राबडी देवींनी सोडलं मौन अन् जाहीर कार्यक्रमात, म्हणाल्या...

SCROLL FOR NEXT