मुंबई

कोरोना होऊन गेल्यावर काय काळजी घ्यावी? नायर रुग्णालयाची पोस्ट कोव्हिड माहिती पुस्तिका

मिलिंद तांबे

मुंबई : कोरोनामुक्त व्यक्तींना आरोग्याची काळजी घेणे महत्वाचे असते. कोरोना होऊन गेल्यावर काय काळजी घ्यावी, आहार कसा असावा, कोणती पथ्य पाळावी याबद्दल नागरिकांमध्ये अद्याप जागरूकता नाही. त्यामुळे नायर रुग्णालयाने डिस्चार्ज नंतर नेमकी काय काळजी घ्यावी या माहितीसाठी एक पोस्ट कोव्हिड माहिती पुस्तिका तयार केली आहे. कोव्हिडच्या उपचारानंतर डिस्चार्ज देतांना तसेच पोस्ट कोविड ओपीडीमध्ये येणाऱ्या रुग्णांना ती दिली जात आहे.

कोरोना नंतरही अनेक आजार जडत असल्याने आणि अनेकांना कोरोनाची पुन्हा लागण होत असल्याचे समोर आल्याने कोव्हिड होऊन गेलेल्या नागरिकांमध्ये काहीसे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र कोव्हिड होऊन गेल्यावर नेमकी काय काळजी घ्यावी याबद्दल नागरिकांमध्ये अजूनही संभ्रम आहे. त्यामुळे आतापर्यंत  प्रकाशित केलेल्या शोधनिबंध प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका निभावलेल्या भौतिकोपचार शाळा व केंद्राच्या मदतीने नायर रुग्णालयाने पोस्ट कोव्हिड माहिती पुस्तिका बनवली आहे. 
कोव्हिड बाधित रुग्णांमध्ये डिस्चार्जनंतर तीव्र थकवा आणि अशक्तपणाच्या तक्रारी  वाढल्या आहेत. यामुळे दैनंदिन कामकाजामध्ये देखील अनेक अडचणी येत आहेत. रूग्णालयातून घरी गेल्यानंतर रूग्णांना येणाऱ्या अडचणी लक्षात घेत डिस्चार्ज नंतर कोव्हिड रुग्णांसाठी ही माहिती पुस्तिका तयार करण्यात आली. यामध्ये सुधारित जीवनशैलीसह दैनंदिन जीवन पूर्ववत करण्यासाठी श्वसनाचे व्यायाम , विश्रांती आणि शारीरिक तंदुरुस्तीबद्दल माहिती दिली आहे.या पत्रकामध्ये आहारशास्त्र विभागाने तयार केलेल्या आहारविषयक सल्ल्यांचा समावेश आहे . बा.य.ल. नायर धर्मादाय रुग्णालय आणि संचालक डॉ . रमेश  भारमल आणि सायन रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ . मोहन जोशी यांनी मार्गदर्शन केले. 

पोस्ट कोव्हिड रुग्णांसाठी माहिती पत्रक इंग्रजी , मराठी आणि हिंदी या तीन भाषांमध्ये तयार केले गेले असल्याने सर्व नागरिकांना याचा फायदा होईल. यासाठी बा.य.ल. नायर धर्मादाय रुग्णालयचे आहारशास्त्र विभाग , वैद्यक औषधशास्त्र विभाग , पल्मोनरी वैद्यकशास्त्र विभाग , भूलवैद्यकशास्त्र विभागातील डॉक्टरांनी अभ्यासपूर्ण हे पुस्तक बनविले असून यात सर्वोतोपरी माहिती दिली आहे. याचा डिस्चार्ज झालेल्या रुग्णांना नक्कीच फायदा होईल पालिका रूग्णालय समुहाचे संचालक डॉ . रमेश  भारमल यांनी सांगितले. 

-----------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT