मुंबई

जेव्हा कुणाल कामरा थेट राज ठाकरेंना उघडपणे देतो लाच...

सकाळवृत्तसेवा

मुंबई - कुणाल कामरा, 'नाम तो सुना हि होगा..' आता कॉमेडियन कुणाल कमाराबद्दल हेच बोलायची वेळ आलीये. कुणाल कामरा हा देशातील नावाजलेला कॉमेडियनतर आहेच मात्र सध्या तो चर्चेत होता ते म्हणजे विमानात त्याने जेष्ठ पत्रकार अर्णब गोस्वामी यांच्यासोबत केलेलं वक्तव्य आणि त्यांनतर त्यावर तीन विमान विमान कंपन्यांकडून लावण्यात आलेली बंदीमुळे. आता तुम्ही म्हणाल, 'आहो ते तर जुनं झालं'. काहीतरी नवीन सांगा. आता कुणाल कामरा पोहोचलाय थेट कृष्णकुंजवर म्हणजेच राज ठाकरेंच्या निवासस्थानी. 

याबद्दलची माहिती स्वतः कुणालने दिली आहे. याबाबत कुणाल कामराने ट्विटरवरून त्यांनी राज ठाकरे यांना दिलेलं निमंत्रणपत्र आणि राज ठाकरे यांना आवडणारा कीर्ती कॉलेज जवळील वडापाव पाठवलाय. महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांना कीर्ती कॉलेजजवळील वडापाव प्रचंड आवडतो हे सर्वांना ठाऊक आहे. हाच वडापाव घेऊन कुणाल थेट  पोहोचला कृष्णकुंजवर. 

'त्या' पत्रात काय म्हटलंय ?           

“मी बराच रिसर्च केला, या सिरिसर्चनंतर 'तुम्हाला कीर्ती कॉलेजजवळील वडापाव आवडतो असं समजलं. म्हणूनच मी तुम्हाला माझ्या 'शो'वर येण्यासाठी लाच म्हणून तुमचा आवडता पदार्थ घेऊन आलोय. जेणेकरुन तुम्ही माझ्या ‘शट अप या कुणाल’ या माझ्या शोमध्ये सहभागी व्हाल. खूप सारं प्रेम आणि तुम्ही कार्यक्रमात याल ही आशा, असं या पात्रात म्हटलंय. 

याचसोबत कुणालने आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय..   

“राज ठाकरे सर आता तरी मला वेळ द्या. सर्वांना वाटतं की माझ्या शोमध्ये पाहुण्यांना आणण्यासाठी मला फार काही मेहनत घ्यावी लागत नाही. पण हे बघा, पाहुण्यांना आणण्यासाठी मी किती प्रयत्न करतो. तुमच्यापर्यंत अधिक चांगला 'कॉन्टेन्ट' म्हणजेच माहिती पोहचवण्यासाठी मी यापेक्षाही अधिक प्रयत्न करणार आहे. कारण माझं तुम्हा सर्वांवर खूप प्रेम आहे. 

when comedian kunal kamra gives vadapav as bribe to mns chief raj thackeray

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पंतप्रधान नरेंद्र मोदींची आज सभा! विमानतळ ते होम मैदान अन्‌ शहरातील ‘हे' दोन मार्ग राहणार बंद; सभेसाठी कसे यायचे, वाहने कोठे लावायची? वाचा सविस्तर

Sakal Podcast : लातुरात कोण बाजी मारणार? ते चित्रपट निवडीबाबत मृणाल ठाकूरचा मोठा खुलासा

Nashik Fire Accident : ‘इलेक्ट्रिकल ऑडिट’कडे दूर्लक्षामुळे आगीला मिळते निमंत्रण; भीषण आगीत कोट्यवधींची मालमत्तेची राख

Priyanka Gandhi : मतांसाठी गांधी आडनावाचा वापर; मोहन यादव यांची प्रियांका गांधींवर टीका

Fact Check: मोदींच्या कोल्हापूरमधील सभेला विक्रमी गर्दी? Viral Photo महाराष्ट्र नव्हे नायजेरिया, चीनचे

SCROLL FOR NEXT