File Photo 
मुंबई

कांदळवनाचे सर्वेक्षण कधी?

सकाळ वृत्तसेवा

मुंबई ः राज्यातील तब्बल 44 हजार कांदळवनांचे सर्वेक्षण न केल्याबद्दल मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी राज्य सरकारची कानउघाडणी केली. याबाबतचा तपशील चार आठवड्यांत दाखल करण्याचे निर्देश खंडपीठाने सरकारला दिले आहेत.

केंद्र सरकारने 2013 मध्ये कांदळवनांचा नकाशा तयार केला आहे. या आरेखनाबाबत राज्य सरकारने असमाधान व्यक्त करून स्वतंत्रपणे आरेखन करण्याचे जाहीर केले होते. उच्च न्यायालयाच्या अन्य एका खंडपीठाने 2013 मध्ये आरेखन करण्याचा आदेशही दिला होता. यासंदर्भात एका पर्यावरणप्रेमी संस्थेने उच्च न्यायालयात केलेल्या जनहित याचिकेवर सोमवारी न्या. शाहरुख काथावाला आणि न्या. बी. पी. कुलाबावाला यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. अद्याप कांदळवनांचे सर्वेक्षण व आरेखन झाले नसल्याचे याचिकादारांनी सांगितले.

त्याबाबत उच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली. केंद्र सरकारने 2013 मध्ये नियम तयार केले असून, अद्याप आरेखन का केले नाही? हे काम करण्यासाठी किती वेळ हवा आहे? असे प्रश्‍न खंडपीठाने उपस्थित केले. त्यावर, 2017 मध्ये सुधारित नियम तयार केल्याचा खुलासा राज्य सरकारने केला. त्यानंतर तपशील तयार करण्यास दोन वर्षे लागतात का, अशी विचारणाही खंडपीठाने केली. याबाबत चार आठवड्यांत लेखी तपशील दाखल करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले. याचिकेवर पुढील सुनावणी जानेवारीत होणार आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता, १४ जिल्ह्यांत जोरदार बरसणार; ४८ तास धोक्याचे

CCTV Crime Footage : पत्नीवरून वारंवार चिडविल्याचा राग मनात धरून पाठलाग करून भर रस्त्यात संपवलं, घटना सीसीटीव्हीत कैद

India vs Pakistan Asia Cup 2025 : आज भारत विरुद्ध पाकिस्तान सामना; दुबईतील भारतीय प्रेक्षकांचाही निरुत्साह, कारण काय?

Truck Accident: देऊळगाव महीजवळील भीषण अपघातात ट्रक पलटी; चालक नागेश दहिफळे यांचा जागीच मृत्यू

Panchang 14 September 2025: आजच्या दिवशी आदित्य हृदय स्तोत्र पठण व ‘श्री सूर्याय नमः’ या मंत्राचा जप करावा

SCROLL FOR NEXT