मुंबई

मनसुख हिरेन यांची हत्या झाली तेव्हा सचिन वाझे घटनास्थळी उपस्थित होते?

पूजा विचारे

मुंबई: मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात अटकेत असलेल्या निलंबित पोलिस अधिकारी सचिन वाझे यांच्या अडचणी वाढल्या आहेत. एटीएसच्या रिमांडमध्ये घटनास्थळी निलंबित पोलिस अधिकारी सचिन वाझे उपस्थित होते अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. मनसुख हिरेन याची हत्या झाली तेव्हा वाझे तिथे उपस्थित होते अशी माहिती सुत्रांनी दिली आहे. मनसुख यांची हत्या करून त्यांच्या तोंडावर रुमाल ठेवून नंतर स्कार्प सारखा मास्क लावण्यात आला आणि मृतदेह खाडीत फेकल्याची माहितीही सुत्रांकडून समजतेय. मनसुखच्या हत्येनंतर त्याच्या मोबाईलमधले सिमकार्ड वेगवेगळ्या मोबाईलमध्ये टाकण्यात आले आणि काही वेळासाठी ते वसईमधल्या मांडवी गावात काही वेळासाठी मोबाईल सुरू करण्यात आला आणि पुन्हा बंद केला असं सांगितलं जात आहे. 

हे सगळं झाल्यानंतर वाझे पुन्हा ठाण्यातून मुंबईच्या दिशेने निघाले आणि रात्रीच्या सुमारास डोंगरी परिसरात रेड सुरू होती असे भासवून त्यांनी डोंगरी पोलिस ठाण्याच्या स्टेशन डायरीमध्ये नोंद केली, अशी माहिती समोर येत आहे. या सगळ्या प्रकरणात वाझे यांचा महत्वाचा रोल आहे म्हणून ते मुख्य आरोपी आहेत अशीही माहितीही सुत्रांनी दिली आहे. 

मनसुख हिरेन हत्या प्रकरणात ATS ला मोठा झटका 

हिरेन मृत्यूचा तपास एटीएसने एनआयएकडे सोपवावा असे निर्देश ठाणे सत्र न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे तपासाबाबत मोठी आघाडी घेऊनही एटीएसवर नामुष्की आली आहे. मुंबईच्या विशेष न्यायालयात बुधवारी एन आय  एने वाझेवर यूएपीए अंतर्गत आरोप ठेवले. स्फोटक वापरणे, तणाव निर्माण करणे इ. तरतूद यामध्ये आहे. साधारणपणे अतिरेकी कारवायांमध्ये या कायद्यानुसार आरोप ठेवले जातात. यामध्ये जामीन मिळणेही मुश्कील असते. याचबरोबर वाझे यांचा सहकारी रियाज काझी यांना सरकारी साक्षीदार म्हणून तपास यंत्रणेने दाखल केले आहे. विशेष न्यायालयात बुधवारी ही माहिती देण्यात आली. यामुळे वाझे यांच्या सर्व कारवायाची माहिती उघड होण्याची शक्यता एनआयएने व्यक्त केली आहे.

हिरेन मृत्यूचा तपास करणाऱ्या राज्य सरकारच्या एटीएस पथकावर आता तपास थांबविण्याची वेळ आली आहे. कारण हा तपास NIAकडे वर्ग करावा असे आदेश ठाणे न्यायालयाने एटीएसला दिले. एटीएसच्या तपासाला यामुळे लगाम बसला आहे. केंद्र सरकारने तपास वर्ग केला असताना ही अजून हा तपास एटीएस का करत आहे, असा प्रश्न न्यायालयाने उपस्थित केला. या प्रकरणात सर्व पुरावे आणि कागदपत्रे NIAला द्यावे असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.  

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अॅंटिलिया निवासस्थानाबाहेर आढळलेल्या स्कॉर्पिओ गाडीत जिलेटीन कांड्या सापडल्या होत्या. ही गाडी हिरेनच्या ताब्यात होती. मात्र हिरेनचा मृतदेह ठाणे खाडीमध्ये आढळला. या सर्व प्रकरणात वाझे यांना प्रमुख आरोपी केले आहे.

When Mansukh Hiren died Sachin Waze was present at spot Sources of information

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubman Gill: 'किंग' कोहलीकडून 'प्रिन्स'चं भरभरून कौतुक! म्हणाला, 'स्टार बॉय, तू इतिहास...'

Latest Maharashtra News Live Updates: पाण्यात अडकलेल्या तरुणाची रेस्क्यू टीमने केली सुटका

Weekly Horoscope: या आठवड्यात गुरु-आदित्य योगामुळे 'या' 5 राशींवर धनवर्षा, बँक खात्यात होईल मोठी भर, जाणून घ्या तुमचं करिअर राशीभविष्य

Maharashtra Rain News: राज्यात पुढचे ४ दिवस मुसळधार, पहा कुठे -कोणता अलर्ट? | Weather Alert

Video : “...अन् साक्षात पांडुरंगाचं दर्शन झालं”, पंढरपूरला निघालेल्या दिव्यांग आजोबांचा वारीतला व्हिडिओ पाहून शॉक व्हाल..

SCROLL FOR NEXT