drain cleaning 
मुंबई

तब्बल 2 लाख 87 हजार मेट्रिक टन गाळ गेला कुठे? नालेसफाईवर विरोधकांचा आक्षेप..

सकाळ वृत्तसेवा

मुंबई: पावसाळ्यापूर्वी  मुंबईत नालेसफाई करण्याचं काम पालिकेनं हाती घेतलं आहे. त्यात बीएमसीकडून संपूर्ण नालेसफाईचं काम झालंय असा दावा करण्यात आला आहे. पालिका प्रशासन शहर आणि उपनगरातील सर्व नाल्यांची सफाई झाल्याचा दावा करीत असले तरी नाले अजूनही गाळात असल्याचे दिसत आहे. 

त्यामुळे 2 लाख 87 हजार 514 मेट्रिक टन इतका नाल्यातून गाळ काढलेला गाळ गेला कुठे? असा सवाल करीत विरोधक आक्रमक झाले आहेत. 

मुंबईतील नाल्यांमधून 2 लाख 87 हजार 514 मेट्रिक टन इतका गाळ काढला. 113 टक्के इतकी नालेसफाई झाली असेल तर तो कुठे टाकला त्याचे व्हिडीओ आम्हाला ध्या अशी मागणी मी केली होती. मात्र त्याबाबत आम्हाला कोणतीही माहिती देण्यात आली नाही. असे असेल तर कशाच्या आधारावर प्रशासन  सर्व नाले साफ झाल्याचा दावा करीत आहे असा सवाल पालिकेचे विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी केला आहे. 

पावसाळ्यापूर्वी मुंबई दरवर्षी ७० टक्के नाले सफाई करते.  ते कामही शंभर टक्के पूर्ण होत नाही. मात्र यंदा पालिका प्रशासनापुढे कोरोनाचे संकट असताना आणि एप्रिलच्या अखेरीस नालेसफाईला सुरुवात झाली असताना नालेसफाई ११३ टक्के झाल्याचा दावा पालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे. 

याबाबत माजी खासदार भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष किरीट सोमय्या यांनी संशय व्यक्त केला होता. जर कचरा तसाच नाल्यांमधून असेल तर त्या ११३ टक्क्यांचा अर्थ काय घ्यायचा? असा सवालही त्यांनी केला होता. 

where is 2 lac metric ton wastage bjp asking questions to bmc

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who is Priya Nair: 92 वर्षांत पहिल्यांदाच महिला CEOची निवड; HULच्या नेतृत्वाची जबाबदारी प्रिया नायर यांच्यावर

Video: दिल्ली पुन्हा 100 वर्ष मागे गेल्यासारखी दुरवस्था! पावसानंतरचा व्हिडिओ पाहून तुम्हीही डोक्याला लावाल हात

Viral Video : काय चाललंय? धबधब्याखाली दोन मुले आक्षेपार्ह अवस्थेत, लोकांच्या माना लाजेने खाली, सार्वजनिक ठिकाण तरी सोडा रे...

Chakan MIDC : चाकण एमआयडीसी परिसरात वर्तुळाकार बससेवा, पीएमपी प्रशासनाचा निर्णय; अध्यक्षांकडून पाहणी

Vlogger of the Year: लोहार यांचा व्लॉगर ऑफ द इयर पुरस्काराने सन्मान

SCROLL FOR NEXT