मुंबई

हळदीत नाचता नाचता तो पडला आणि...

सकाळ वृत्तसेवा

उल्हासनगर : लग्नसमारंभापेक्षाही तरूणाईसाठी अधिक जवळचा असणारी हळदी समारंभ एका तरूणाला चांगलाच महाग पडला आहे. हळद म्हटला की, सर्व घरातल्या मंडळींसह सर्व मित्रपरिवाराच एकच काम हळद खेळायची आणि नाचून नाचून धिंगाणा घालायचा. त्यात जेवनाची मेजवानी म्हणजे दुग्धशर्करा योगच... 

उल्हासनगरमध्ये मात्र ही हळद एका तरूणाच्या जीवावर बेतली आहे. हळदीत डीजेच्या तालावर बेभान नाचणाऱ्या या तरूणाला  अचानकपणे हृदयविकाराचा झटका आल्याने त्याच मृत्यू झाला आहे. अर्षद शेख असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव असून तो अवघ्या 25 वर्षाचा होता. 

उल्हासनगर शहरातील कॅम्प नं.3 येथील ओटी सेक्‍शन परिसरातील एका हळदी सभारंभात ही घटना घडली आहे. ओटी सेक्‍शन परिसरातील आशीर्वाद सोसायटीमध्ये अर्षद शेख हा कुटुंबासह राहत होता. याच परिसरात एका लग्न सोहळ्याच्या निमित्ताने हळदी समारंभ ठेवण्यात आला होता. या वेळी डीजेच्या तालावर बेभान नाचत असताना त्याच्या छातीत दुखू लागल्याने त्याला अर्षदला उपचारासाठी त्वरित मध्यवर्ती शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र येथील डॉक्‍टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी मध्यवर्ती पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक वाजे करीत आहेत.  
 

web title : while dancing he had heart attack

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mill Workers House: गिरणी कामगारांचे स्वप्न पूर्ण होणार! 'या' जागेवर उंच निवासी इमारती उभारणार; बीएमसीचा मोठा निर्णय

IND vs PAK U19: भारताचं पाकिस्तानसमोर मोठं लक्ष्य! ऍरॉन जॉर्जचं शतक हुकलं, आयुष म्हात्रे - कनिष्क चौहाननेही गोलंदाजांना चोपलं

Nashik Leopard : सहा तासांची थरारक मोहीम! मालेगावच्या खाकुर्डीत विहिरीत पडलेल्या बिबट्याला वन विभागाने केले जेरबंद

Latest Marathi News Live Update: नाशिकमध्ये ‘वाईन टुरिझम’ला नवी उभारी; पर्यटन, शेती आणि उद्योगाचा संगम

Bride Viral Video: त्याला शेवटचं भेटायचंय... लग्नाच्या २ तास आधी प्रियकराला भेटायला गेली नवरी, पण तिथं नेमकं काय घडलं? पाहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT