Mihir Shah 
मुंबई

Mumbai Worli Hit and Run: शिवसेनेच्या नेत्याचा मुलगा, दहावी पास...वरळी हिट अँड रन प्रकरणातील आरोपी मिहीर शहा कोण आहे?

Mumbai Worli BMW hit and run Case Mihir Shah: रविवारी पहाटे सव्वापाचच्या सुमारास अॅनी बेझंट मार्गावर हा अपघात घडला. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपी मिहीर फरारी आहे.

कार्तिक पुजारी

मुंबई- पुण्यातील पोर्श मोटारीच्या 'हिट अँड रन'च्या घटनेची मुंबईत पुनरावृत्ती झाली आहे. शिवसेनेचे पालघरचे उपनेते राजेश शहा यांचा मुलगा मिहीर याने बेदरकारपणे मोटार चालवून दुचाकीला मागून दिलेल्या धडकेत कावेरी नाखवा (वय ४५) या महिलेचा मृत्यू झाला, तर पती प्रदीप हे जखमी झाले आहेत. रविवारी पहाटे सव्वापाचच्या सुमारास अॅनी बेझंट मार्गावर हा अपघात घडला. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपी मिहीर फरारी आहे.

आरोपी मिहिर शहा कोण आहे?

शिवसेना शिंद गटाचे नेते राजेश शहा यांचा मिहीर शहा मुलगा आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, अपघातानंतर आरोपी गर्लफ्रेंडच्या घरी गेला होता. गर्लफ्रेंडची देखील चौकशी करण्यात आली आहे. मिहीर शहा BMW चालवत होता. त्यानेच मद्यधुंद अवस्थेत दोघांना उडवल्याचं सांगितलं जातंय. एवढेच नाही तर त्याने महिलेला २ किलोमीटरपर्यंत फरफटत नेल्याचं सांगितलं जातं. या पार्श्वभूमीवर मिहीर शहा कोण आहे? हे जाणून घेऊया.

मिहीर शहा २४ वर्षांचा आहे. मिहीरचे १० वी पर्यंत शिक्षण झाले आहे, त्यानंतर त्याने पुढील शिक्षक घेतलेले नाही. आरोपीच्या वडिलांचा रियल इस्टेटचा मोठा व्यवसाय आहे. या व्यवसायात मिहिर शहा वडिलांना मदत करतो. BMW चालवत असताना त्याच्यासोबत राजऋषी बिडावत हा व्यक्ती होता असं सांगण्यात आलंय. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. बांद्रा ईस्टच्या कलानगर भागात BMW बेवारस आढळून आली होती. तो कार इथे सोडून ऑटोमधून पळून गेला होता. तो ऑटोमधून बोरीवली येथे उतरल्याचं सांगण्यात आलंय.

अपघातानंतर सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले आहे. वरळी कोळीवाड्यात राहणाऱ्या कावेरी नाखवा आणि प्रदीप नाखवा यांचा मासेमारीचा व्यवसाय आहे. दोघे रविवारी पहाटे क्रॉफर्ड मार्केट येथे मच्छी आणण्यासाठी दुचाकीवरून गेले होते. बाजारातून परतत असताना हाजीअलीवरून थोडे पुढे अॅनी बेझंट मार्गावर एट्रिया मॉलजवळ मिहीर शहाच्या मोटारीने त्यांना मागून धडक दिली. प्रदीप हे मोटारीच्या बोनेटवर पडून डाव्या बाजूला पडले, तर कावेरी या मोटारच्या समोर पडल्या.

राजेश शहांना अटक

पोलिसांनी शिवसेनेचे उपनेते राजेश शहा आणि अपघात घडला तेव्हा मिहीरसोबत गाडीत असलेला राजऋषी बिडावत या दोघांना अटक केल्याची माहिती उपायुक्त कृष्णकांत उपाध्याय यांनी दिली. या प्रकरणी भारतीय न्याय संहितेतील कलम १०५ २८१, १२५ (ब), २३८, ३२४(४) आणि मोटारवाहन अधिनियमातील १८४, १३४ (अ आणि ब) १८७ नुसार गुन्हा नोंदवल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच मुख्य आरोपी मिहीर याचा शोध सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री शिंदे काय म्हणाले?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याप्रकरणी म्हणाले आहेत की, 'कोणालाही पाठीशी घालण्यात येणार नाही. पक्षाचा पदाधिकारी असला तरी त्याच्यावर कारवाई करण्यात येईल.' उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, 'कोणाला सोडण्यात येणार नाही. याप्रकरणी कोणाचाही पोलिसांवर दबाव नाही.'

आरोपीने दारू प्यायली नव्हती?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हिट अँड रन करण्याच्या आधी काही तास आपल्या मित्रांसोबत एका पबमध्ये गेला होता. पब मालकाने मिहीर शहाने दारू प्यायली नसल्याचं सांगितलं आहे. त्याने रेड बुल पिल्याचं पब मालकाने सांगितलं आहे. पण, पोलीस सर्व बाजूंनी तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana eKYC Deadline Extension: मोठी बातमी! लाडक्या बहिणींना सरकारकडून दिलासा; अखेर eKYC साठी जाहीर केली मुदतवाढ

Kannad Nagarparishad Election : कन्नडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप यांचा युतीचा फॉर्म्युला ठरला; जिल्हाध्यक्ष संजय खंबायते यांची माहिती

Dharur Nagarparishad Election : धारूर नगरपरिषदेत चौरंगी लढत रंगणार! अध्यक्षपदासाठी १६, तर नगरसेवक पदासाठी तब्बल १५१ नामनिर्देशन पत्र दाखल

Latest Marathi Breaking News: देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Drone Delivery Service: दूध, किराणा, पॅकेजेस… सगळं थेट ड्रोनने घरी पोहोचणार! मुंबईत पहिली निवासी ड्रोन डिलिव्हरी सेवा सुरू होणार, पण कधी?

SCROLL FOR NEXT