मुंबई

पनवेलच्या नवीन महापौर कोण?

सकाळ वृत्तसेवा

खारघर : पनवेल पालिकेच्या विद्यमान महापौर डॉ. कविता चौतमोल यांचा अडीच वर्षांचा कार्यकाळ संपुष्टात आला आहे. पुढील अडीच वर्षांसाठी महिला खुल्या वर्गासाठी राखीव असल्याने नवीन वर्षात महापौर पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार, या चर्चेला उधाण आले आहे. एक लाख मतदारसंख्या असलेल्या आणि पहिल्याच निवडणुकीत भाजपला १२ नगरसेवक देणाऱ्या खारघरमध्ये महापौरपद मिळावे, अशी चर्चा भाजपच्या कार्यकर्त्यामध्ये सुरू आहे.

पनवेल पालिकेची स्थापना झाल्यावर पहिल्याच निवडणुकीत खारघरवासीयांनी भाजपचे सर्वेसर्वा ठाकूर परिवारावर विश्‍वास ठेवत खारघरच्या विकासासाठी १२ नगरसेवक पालिकेत पाठविले. अडीच वर्षांनी होणाऱ्या पालिका निवडणुकीत नगरसेवक संख्या बारावरून पंधरा होण्याची शक्‍यता आहे. खारघरमध्ये भाजपचे वर्चस्व टिकून राहावे आणि पुढील अडीच वर्षे महापौर खुल्या गटातील महिलांसाठी राखीव झाल्यामुळे खारघर शहराला महापौर पदाचे नेतृत्व मिळावे, अशी येथील नागरिकांची मागणी आहे. खारघर वसाहतीमध्ये सध्या लीना गरड, नेत्रा पाटील आणि संजना कदम या तीन महिला खुल्या गटातील नगरसेविका आहेत. 

लीना गरड यांना सामाजिक कार्याचा मोठा अनुभव आहे. खारघर फोरमच्या माध्यमातून त्यांनी राबविलेल्या उपक्रमांमुळे पालिका हद्दीतही त्या परिचित आहे. या शिवाय उच्चशिक्षित असल्यामुळे महापौरपद त्या चांगल्या पद्धतीने सांभाळू शकतात. 
- राकेश सोमाणी, अध्यक्ष, महेश्‍वर समाज, खारघर.

महिला खुल्या गटासाठी महापौरपद राखीव झाले आहे. त्यात खारघरमध्ये खुल्या गटात उच्चशिक्षित महिला नगरसेविका आहेत. त्यामुळे खारघरला महापौरपद मिळावे, असे वाटते. ही संधी चालून आली आहे. शेवटी हा पक्षाचा निर्णय आहे.
- संजय जाधव, पदाधिकारी संघर्ष समिती, खारघर. 

महापौर पदाविषयी पक्ष योग्य निर्णय घेईल. खारघरला महापौर पदाचा मान मिळावा व तो सर्वसाधारण महिला प्रवर्गातील महिलेस मिळावा. डॉ. कविता चौतमोल या एक उच्चशिक्षित महिला असल्यामुळे त्यांनी महापौरपदाची जबाबदारी उत्तमरित्या पार पाडली.
  - नेत्रा पाटील, नगरसेविका.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Babasaheb Patil RBI action : सहकार मंत्री बाबासाहेब पाटलांवर RBIची कारवाई; नियमांचे उल्लंघन केल्याने जिल्हा बँकेच्या संचालकपदावरून बडतर्फ?

Western Ghats Biodiversity : सह्याद्रीच्या कुशीत दडलाय अमूल्य खजिना! आजरा परिसरात सापडल्या शेकडो दुर्मीळ औषधी वनस्पती; टाटा संस्थेकडून सर्वेक्षण

दुष्काळात कुणी खाईना का? ५०-६० रुपयांचे ड्रायफ्रूट्स, राईचा पर्वत करायची काय गरज? काजू-बदाम खाणाऱ्या खासदाराची प्रतिक्रिया

Latest Marathi News Update : गोकुळ निवडणुकीमध्ये भाजप सर्व 25 जागांवर उमेदवारी अर्ज भरणार

Asian Games: जपानमध्ये भारतीय नेमबाजांचे मोठे हाल! राही सरनोबतच्या हॉटेल बुकिंगबाबत घडला विचित्र प्रकार उघड

SCROLL FOR NEXT