मुंबई

UT Is Mean ? वर्षा बंगल्याच्या भींतीवर 'हे' लिहिलं कुणी?

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : महाराष्ट्रात सत्तापालट झालाय. आता महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार आहे. उद्धव ठाकरे आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालेत. अशातच मुंबईतील मुख्यमंत्री बंगल्यावर म्हणजेच वर्षावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात आक्षेपार्ह वाक्य लिहिण्यात आली आहेत. 

मुंबईतील वर्षा हा मुख्यमंत्र्यांचा बंगला आहे. उद्धव ठाकरे अजूनही वर्षावर राहण्यास गेलेले नाहीत. अशातच या बंगल्याच्या भिंतींवर उद्धव ठाकरे यांच्या विरोधात काही वाक्य लिहिण्यात आल्याने हि वाक्य कुणी लिहिलीत हा प्रश्न आता विचारला जातोय.  

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षा बंगला रिकामा केल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या बंगल्यात राहण्यासाठी येण्याची शक्यता आहे. वर्षा बंगला सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आहे. या विभागाचे काही अधिकारी या बंगल्याची पाहणी करण्यासाठी गेले असता वर्षा बंगल्याच्या भिंतीवर उद्धव ठाकरे यांचा तिरस्कार करणारी वाक्य आढळून आली आहेत. या प्रकारामुळे शिवसेना-भाजप मधील शाब्दिक वाद पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे.

नक्की भिंतींवर लिहिलंय काय ?

यामध्ये Who is UT? म्हणजे यू टी कोण आहेत? यू टी इज मीन म्हणजे यू टी वाईट आहेत. शट अप अशी वाक्य वर्षा बंगल्याच्या भींतीवर लिहीली असल्याची आढळून आलीत.

महाराष्ट्रातील सत्ता हातातून गेल्यामुळे माजी मुख्यमंत्री यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी सध्या सोशल मिडीयावरून आपली नाराजी आणि उद्विग्नता सातत्याने मांडत आहेत. त्यात आता वर्षा बंगल्याच्या भींतीचीही भर पडलीय. राज्याचं मुख्यमंत्री पद गेल्यामुळे फडणवीस कुटुंबाला वर्षा बंगलाही सोडावा लागला. आता हा बंगला नव्या मुख्यमंत्र्यांना रहाण्यासाठी सूपूर्द करण्यात येत असतानाच वर्षा बंगल्यातील खोलीच्या भींतीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह लिहलं असल्याची माहीती आता समोर आली आहे

सध्या शिवसेना - भाजपमध्ये जोरदार ट्रोल वॉर सुरू आहे.यातच वर्षा बंगल्याच्या आत अश्याप्रकारची वाक्य लिहिलेली असल्याने या वादात आणखी भर पडण्याची शक्यता आहे.मात्र ही वाक्य कधी किंवा कुणी लिहिली असावी याबद्दल समजू शकलेले नाही.

Webtitle : who wrote UT is mean on the wall of varsha bungalow 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Angar Nagar Panchayat : राज्यभर चर्चित अनगर नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाची निवडणूक स्थगित; जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांचे आदेश

Latest Marathi News Live Update : दहशतवाद्यांचा कट उधळला; दिल्ली पोलिसांकडून तीन जणांना तीन राज्यांतून अटक

Amravati News : निवडणुकीत झाला विजय! तांबट पक्षी झाला अमरावतीचा ‘सिटी बर्ड’; सहा पक्ष्यांमध्ये रंगला सामना

Solapur Accident : सोलापूरमध्ये कार अन् ट्रकचा भीषण अपघात; ५ जणांचा जागीच मृत्यू, दोघे जखमी; तुळजापूरला देवदर्शनासाठी जाताना काळाचा घाला

माेठी बातमी ! 'शहाजी पाटील यांच्या कार्यालयासह चार ठिकाणी धाडी'; सांगोल्यात उडाली खळबळ; रात्री उशिरापर्यंत तपासणी

SCROLL FOR NEXT