Raj and Uddhav thackeray 
मुंबई

'आता लोकल सुरु करा अन्यथा...'मनसेचा आंदोलनाचा इशारा

अजूनही लोकल सुरु झालेली नाहीय. त्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. नागरिकांकडून सातत्याने लोकल प्रवास सुरु करण्याची मागणी होत आहे.

सुमित सावंत

मुंबई: मुंबईत (Mumbai) लोकल सुरु (Locl travel) करण्याची मागणी दिवसेंदिवस जोर पकडू लागली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे (corona second wave) लोकल प्रवास सर्वसामान्यांसाठी (common public) बंद करण्यात आला होता. अजूनही लोकल सुरु झालेली नाहीय. त्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. नागरिकांकडून सातत्याने लोकल प्रवास सुरु करण्याची मागणी होत आहे. (Whose vaccination completed allow them train travel other wise we will protest mns dmp82)

नागरिकांच्या याच मागणीची दखल घेऊन राजकीय पक्ष आता लोकलसाठी आंदोलन सुरु करण्याच्या पावित्र्यात आहेत. भाजपाकडूनही याआधी लोकल सर्वसामान्यांसाठी सुरु करण्यासाठी आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. आता मनसेनेही तशीच भूमिका घेतली आहे.

कोरोना प्रतिबंधक लसीचे ज्यांनी दोन डोस घेतले आहेत, त्यांना लोकल प्रवासाची परवानगी द्यावी, अन्यथा महाराष्ट्र सैनिक रेल भरो आंदोलन करतील, असा इशारा मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी दिला आहे. काही दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून लसीचे दोन डोस घेतलेल्यांसाठी लोकल प्रवास खुला करावा, अशी मागणी केली होती.

काल मुख्यमंत्र्यांची टास्क फोर्ससोबत बैठक झाली. राज्यातील काही भागात आता दुकाने रात्री आठ वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी दिली जाऊ शकते. पण दुकाने आठ पर्यंत खुली ठेवण्यास परवानगी दिली, तर लोक कामाच्या ठिकाणी पोहोचणार कसे? असा मुद्दा संदीप देशपांडे यांनी उपस्थित केला आहे. कारण लोकल बंद असल्यामुळे लोकांचे बस अन्य पर्यायी साधनांनी प्रवास करुन कामाच्या ठिकाणी पोहोचताना प्रचंड हाल होत आहेत, असा मुद्दा त्यांनी मांडला.

लोकलसाठी प्रवाशीच करणार विनातिकिट आंदोलन, वकिल लढवणार मोफत खटला

सर्वसामान्य प्रवाशांना लोकल सेवा सुरू करण्यासाठी सरकारकडून कोणतीही पावले उचलली जात नाहीत. मंत्र्यांकडून कोणतीही सकारात्मक चर्चा होत नाही. रेल्वे प्रवासी संघटनेच्या निवेदनाची दखल घेतली जात नाही. त्यामुळे आता प्रवाशांनी विनातिकिट लोकल प्रवास करण्याचे आंदोलन हाती घेतले आहे. तर, या आंदोलनातील आंदोलनकर्त्यांना अडकविले गेल्यास त्याची केस विना मोबदला वकिलांकडून लढविली जाणार आहे. न्यायालयीन खटला लढण्यासाठी वकिलांची मजबूत फळी तयार झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Malegaon Municipal Election : मालेगावात हलगर्जीपणाचा कळस! मृत शिक्षकाला लावली निवडणूक ड्युटी; गटशिक्षणाधिकाऱ्यांना नोटीस

Latest Marathi News Live Update : कल्याण पूर्व-पश्चिमेत भाजप कार्यकर्त्यांचा आक्रोश; महायुतीतील जागावाटपावर तीव्र नाराजी

Karuna Munde हिंदूंनी ४ मुलं जन्माला घालावीत म्हणणाऱ्या Navneet Rana ना टोला | Sakal News

Mumbai News: ९०७ हॉटेल, पब, बार, क्लबची झाडाझडती; अग्निशमन दलाकडून आस्थापनांवर कारवाईचा बडगा

Nashik Wine : नाशिकच्या 'रानमेव्या'चा अमेरिकेत डंका; जांभूळ वाइनची पहिली खेप सातासमुद्रापार रवाना!

SCROLL FOR NEXT