parmabir-anil.png 
मुंबई

देशमुखांविरोधात तुम्ही पोलीस तक्रार का नाही नोंदवली? हायकोर्टाचा परमबीर सिंह यांना सवाल

दीनानाथ परब

"महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख काही चुकीच करतायत हे तुम्हाला माहित होतं, तरी तुम्ही त्यांच्याविरोधात पोलीस तक्रार का नाही नोंदवली?" असा सवाल मुंबई उच्च न्यायालयाने परमबीर सिंह यांना विचारला. परमबीर सिंह यांनी अनिल देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. या आरोपांची सीबीआय चौकशी करण्याच्या मागणासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. अनिल देशमुखांनी एनआयएच्या अटकेत असलेल्या सचिन वाझेला बार, रेस्टॉरंटकडून महिन्याला १०० कोटीच्या वसुलीचे टार्गेट दिले होते, असा गंभीर आरोप परमबीर सिंह यांनी केला आहे. 
FIR दाखल झालेला नसताना, आम्ही हस्तक्षेप करणार नाही तसेच स्वतंत्र चौकशीचेही आदेश देणार नाही असे उच्च न्यायालयाने स्पष्ट केले. "तुम्ही वरिष्ठ पोलीस अधिकारी आहात. तुम्ही अनिभज्ञ नव्हता. तुमच्या वरिष्ठांनी गुन्हा केला असेल किंवा काही चुकीचं केलं असेल, तर तुम्ही गुन्हा नोंदवू शकता. तुम्ही शांत राहिलात", असे मुख्य न्यायमुर्ती दीपांकर दत्ता म्हणाले. 

"तुम्ही सर्वात आधी देशमुखांविरोधात FIR नोंदवा. पोलिसात तक्रार नोंदवणं पहिलं योग्य पाऊल असेल. पोलीस FIR नोंदवत नसतील, तर न्यायदंडाधिकाऱ्यांपुढे अर्ज करण्याचा पर्याय तुमच्याकडे आहे" असं कोर्टाने म्हटलं आहे. 

अनिल देशमुख यांच्या विरोधातील याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात युक्तिवाद झाला. परमबीर सिंह यांचे वकील विक्रम ननकानी यांनी त्यांची बाजू मांडली. मात्र, परमबीर सिंग यांनी केलेली याचिका ही जनहित याचिका असू शकेल का? असा सवाल न्यायमूर्तींनी केला. तसेच, इतरही काही मुद्द्यांवर कोर्टाने महत्त्वाची निरिक्षणे नोंदवली.

'गृहमंत्र्यांनी दरमहा 100 कोटींची मागणी केल्याचे आरोप आहेत. ही 100 कोटींची मागणी त्यांनी तुमच्यासमोर केली होती का?', असा सवालही कोर्टाने केला. सध्या ही याचिका ही केवळ ऐकीव गोष्टींवर केलेले आरोप असल्याचं दिसतंय. तुमच्या अधिकाऱ्यांनी तुम्हाला हे सारं तोंडी सांगितलं. तर तुम्ही त्याची शपथपत्रे यात जोडली आहेत का? तसं नसेल तर तुमच्याकडे याचे काहीही पुरावे नाहीत, असं निरिक्षण न्यायालयाने नोंदवले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Madhuri Elephant Nandani : अखेर माधुरी हत्तीण दोन दिवसात कोल्हापुरात येणार! वनतारातून नांदणीकडे प्रस्थान; राजू शेट्टीनी सोशल मीडियावर दिली माहिती

India T20I Squad : हर्षित राणाला नवी दुखापत, अफगाणिस्तान मालिका अन् Asian Games ला मुकणार! विदर्भाच्या खेळाडूला टीम इंडियात संधी

मुंबई गोवा हायवेच्या उद्घाटनाला येणार नाही, लाज वाटते; गडकरींचे विधान, म्हणाले, आता वेगळा वर्ल्ड रेकॉर्ड करायचाय

Maratha Reservation: मनाेज जरांगेंना ज्योती मेटेंचा थेट सवाल; ‘१२ मागण्या मान्य झाल्या, मग मुंबईला जाण्याचा हट्ट कशासाठी?’

Marathi News Live Updates : जरांगेंच्या समर्थनार्थ मराठा तरुणांचा आक्रमक एल्गार, पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन

SCROLL FOR NEXT