why no sedition case against drdo scientist pradeep kurulkar till now asks prithviraj chavan esakal
मुंबई

Dr. Pradeep Kurulkar : कुरुलकरवर देशद्रोहाचा खटला का नाही; काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांचा सरकारला सवाल

काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांचा विधानसभेत सरकारला सवाल

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : हनीट्रॅपमध्ये अडकून पाकिस्तानी महिलेला देशाची संरक्षणविषयक गुप्त माहिती पुरविणाऱ्या ‘डीआरडीओ’चा संचालक प्रदीप कुरुलकर याच्यावर केवळ ऑफिशिअल सिक्रेट ॲक्ट कायद्यान्वये खटला सुरू आहे, मात्र एवढ्या गंभीर प्रकरणात त्याच्यावर देशद्रोहाचा खटला का लावण्यात आली नाही, अशी मागणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विधानसभेत केली.

चव्हाण यांनी शून्यप्रहरात हा मुद्दा उपस्थित केला. ‘‘काही दिवसांपूर्वी पुणे येथे डीआरडीओचा उच्चपदस्थ अधिकारी प्रदीप कुरुलकर याला एटीएसने अटक केली. इंटरनेटवर पाकिस्तानी महिलेशी त्याची ओळख झाली झाली.

त्यानंतर परदेशात तो त्या महिलेला भेटला. त्यानंतरही तो इंटरनेटच्या माध्यमातून तिच्या संपर्कात होता. या दरम्यान ‘ब्राह्मोस’ची माहिती या पाकिस्तानी महिलेला पुरविली असल्याचा संशय आहे. मात्र असे असतानाही त्याच्यावर केवळ ऑफिशिअल सिक्रेट ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

देशाच्या सुरक्षेशी संबंधित असलेली घटना असताना, त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल नाही, राष्ट्रीय तपास यंत्रणे (एनआयए)कडे तपास सोपवला गेला नाही. त्याचबरोबर तो एका सामाजिक संस्थेशी संबंधित होता,’’ याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी चव्हाण यांनी या वेळी केली.

या अधिकाऱ्यावर देशद्रोहाचा खटला चालवायला हवा. त्याच्याविरोधात देशद्रोहाचा खटला का चालला नाही, याची तपासणी करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांना द्या अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या जयंत पाटील यांनी विधानसभा अध्यक्षांकडे केली.

तर हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने त्यावर सभागृहात चर्चा करणे योग्य नसल्याचे सांगत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी चर्चा करण्यास परवानगी नाकारली. तसेच चार्जशीट दाखल झाल्यावर न्यायालय गुन्ह्याची व्याप्ती पाहून कलमे लावण्याबाबत निर्देश देऊ शकते असेही नार्वेकर यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cheteshwar Pujara Retire: भारताचा 'टेस्ट स्पेशालिस्ट' निवृत्त! पुजाराने केली मोठी घोषणा; म्हणाला, 'प्रत्येक चांगली गोष्ट...'

Latest Marathi News Updates : सांगोला तालुक्यात लांडग्यांचा कहर!

'जर कोणी माझ्यासाठी या दोन गोष्टी केल्या, तर मी आयुष्यात कधीच दक्षिणा घेणार नाही'; बागेश्वर बाबांचे मोठे विधान

Viral Video : महिलेने वाचविलेला जीव, अनेक वर्षांनी दिसताच सिंहांनी मारली मिठी, हृदयस्पर्शी व्हिडिओ पाहून तुमच्याही डोळ्यांत येईल पाणी

Thalapathy Vijay चा मेगा ब्लॉकबस्टर शो! Modi च्या सभेपेक्षा जास्त गर्दी, पडद्यावरून थेट मैदानात कसा आला?

SCROLL FOR NEXT