Bharat Gogavale 
मुंबई

Winter Session : "आपण मित्र आहोत कोणीही मंत्री झालं तरी सेलिब्रेशन करु"; शिंदे-ठाकरे गटाच्या आमदारांची रंगली जुगलबंदी

विधानभवन परिसरात रंगला भरत गोगावले यांच्या कोटचा किस्सा

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. यावेळी विधानभवन परिसरात शिवसेनेच्या शिंदे आणि ठाकरे गटाचे आमदार एकत्र पहायला मिळाले. यावेळी शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांनी मंत्रीपदासाठी शिवलेल्या कोटचा किस्सा रंगला.

यावेळी रंगलेल्या जुगलबंदीमध्ये संजय शिरसाट यांनी वैभव नाईक यांना उत्तर देताना मिश्किल टिप्पणी केली. "आपण मित्र आहोत कोणीही मंत्री झाला तरी सेलिब्रेशन करु" असं त्यांनी म्हटलं. (Winter Session Shinde Thackeray group MLAs Bhart Gogavale Sanjay Shirsat Vaibhav Naik making fun over Ministrial post)

विधानभवन परिसरात नेमकं काय घडलं?

विधानभवन परिसरात सर्व आमदार येत असताना माध्यमांच्या प्रतिनिधींनी भरत गोगावले यांना घेरलं आणि मंत्रिमंडळ विस्तार आणि मंत्रीपदावरुन काही प्रश्न विचारायला सुरुवात केली. यावेळी त्याठिकाणी संजय शिरसाटही उपस्थित होते. तसेच ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईकही तिथं आले आणि गोगावले मीडियाशी बोलत असताना त्यांना काही सूचना करु लागले. (Latest Marathi News)

वैभव नाईक (गोगावलेंना म्हणाले) : मंत्रीपदासाठी तुम्ही जो कोट शिवला आहे तो तुम्ही घालायला पाहिजे.

भरत गोगावले : अधिवेशन संपताना मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार मी तुम्हाला सांगतो आणि जर वैभवची इच्छा असेल तर त्याला माझा कोट चढवतो. मी सध्या एखाद्या गोष्टीसाठी थांबलो आहे आणि वैभव जर आमच्याबरोबर येत असेल तर मी त्याच्यासाठीही अजून थांबू शकतो.

वैभव नाईक: मला ही ऑफर कोण देतंय ज्यांना मिळालं नाही ते देत आहेत. आम्ही सध्या विरोधीपक्षात असलो तरी आमची इच्छा आहे की या लोकांनी ज्यापद्धतीनं शिवसेनेत उठाव केला होता. त्यापद्धतीनं त्यांना मंत्रीपद मिळालेलं नाही, याचं आम्हाला दुःख आहे.

संजय शिरसाट : भरत गोगावलेंचा व्हिप आता आम्हाला चालतो त्यामुळं त्यांनी जे विधान केलेलं असतं ते अधिकृत असतं. त्यामुळं तुझी इच्छा असेल कोट घालायची तर बघ बाबा.

वैभव नाईक : मंत्रीपद नाही मिळालं तरी चालेल पण तुम्ही कोट घालून या. त्यामुळं उद्यापासून कोट घालून या म्हणजे भरत शेठ शेठ वाटतात. (Marathi Tajya Batmya)

भरत गोगावले : वैभव हा आमचा पुर्वाश्रमीचा मित्र आहे त्याचा मित्रत्वाचा सल्ला आम्ही घेऊ शकतो. तुझे विचार चांगले आहेत आणि तू कोकणातला आहेत.

वैभव नाईक : आता आम्ही तर ऐकलं आहे की काँग्रेसमधले काही लोक शिवसेनेबरोबर येणार आहेत.

संजय शिरसाट : आत्ता नार्वेकरांकडं सुनावणी सुरु आहे. ही सुनावणी जेव्हा संपेल तेव्हा काही लोक अपात्र होणार आहेत. ते कोण होणार आहेत त्याचा आमचे वरिष्ठ विचार करत असतील. म्हणून इनकमिंगही होणार असेल तर विस्तार थांबला असेल पण वैभव काहीजरी झालं तर एक लक्षात ठेव आपण मित्र आहोत. तु मंत्री झाला काय अन् मी मंत्री झालो काय आपण आनंद साजरा करु.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND, 2nd Test: शुभमन गिलला पावसाची भीती दाखवणाऱ्या हॅरी ब्रुकला आकाश दीपने दिला गुलिगत धोका; पाहा Video

Shocking! क्षणीक सुखासाठी तरुणीचा भलताच उद्योग! गुप्तांगात बाटली फसली; लज्जेमुळे वेदनेने व्हिवळत राहिली, नंतर जे घडले त्याने...

माेठी बातमी! 'गैरप्रकार करणाऱ्या शिक्षकांवर कारवाईचे आदेश'; बदल्‍यांच्‍या लाभासाठी चुकीची कागदपत्रे दिल्‍याचे स्‍पष्‍ट

Navodaya Vidyalaya Admission: नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षाचे ऑनलाइन अर्ज सुरु; जाणून घ्या कसा आणि कुठे करावा

नमित मल्होत्रा यांच्या ‘रामायण' सिनेमाच्या टीझरची चर्चा; प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली

SCROLL FOR NEXT