चीनहून परतली, अन् 'कोरोनो' घेऊन आली! 
मुंबई

चीनहून परतली, अन् 'कोरोना' घेऊन आली!

सकाळ वृत्तसेवा

नवी मुंबई : बीजिंग, बॅंकॉक आणि मलेशिया असा प्रवास करून भारतात परतलेल्या वाशीतील एका 29 वर्षीय महिलेला कोरोना विषाणूची लागण झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. "कोरोना'बाधित रुग्णांसाठी विमानतळावरील तपासणीत या महिलेवर संशय आल्याने अधिकाऱ्यांनी या महिलेला शनिवारी मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. सध्या या महिलेवर तज्ज्ञ डॉक्‍टरांच्या निदर्शनाखाली उपचार सुरू आहेत. 

संबंधित महिला कामानिमित्ताने परदेशात गेली होती. बॅंकॉक आणि मलेशिया या दोन देशांच्या दौऱ्यानंतर चीनमधील बीजिंग शहरातून 19 फेब्रुवारीला ती भारतात परतली. दरम्यान, विमानतळावर तिची तपासणी केली असता तिच्यात "कोरोना'ची लक्षणे आढळून आली. महिलेला ताप असल्यामुळे शनिवारी तत्काळ कस्तुरबा गांधी रुग्णालयात रवानगी करण्यात आली. सध्या या महिलेवर उपचार सुरू असून, सर्व चाचण्या घेण्यात आल्यानंतरच रुग्णालयातून सोडण्यात येणार असल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले. 

विमानतळावर प्रवाशांची तपासणी 
18 जानेवारीपासून आत्तापर्यंत परदेशातून भारतात येणाऱ्या तब्बल 46 हजार 218 प्रवाशांची मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर पडताळणी करण्यात येत आहे. परदेशातून येणाऱ्या प्रवाशांची चाचणी करण्यासाठी विमानतळावर विशेष तपासणी कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील 288 प्रवाशांपैकी 82 प्रवाशांना कोरोना व्हायरसची लक्षणे दिसून आल्यामुळे त्यांना कस्तुरबा येथे स्थापन केलेल्या कक्षात उपचारासाठी पाठवण्यात आले आहे. त्यापैकी 80 जणांच्या रक्ताचे नमुने तपासले असता ते कोरोनाबाधित नसल्याचे निष्पन्न झाले आहे. परंतु चीनमधील वुहान शहरातून भारतात येणाऱ्या प्रवाशांवर आरोग्य विभागाची करडी नजर असणार आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Home Minister resignation : नेपाळमध्ये मोठा राजकीय भूकंप! गृहमंत्र्यांनी दिला राजीनामा; २० पेक्षा अधिक जणांचा मृत्यू

Bidkin Accident : अज्ञात वाहनाने दिलेल्या हुलकावणीमुळे दुचाकीचा अपघात; एक तरुण ठार, एक जण गंभीर जखमी

Gas Leakage : बोईसर तारापूरमध्ये वायू गळती; नागरिकांमध्ये घबराट

Pune Ganpati Visarjan : मिरवणुकीत दीड टन चप्पल, बुटांचा खच; ७०६ टन कचरा उचलला

भाच्याने बळकावली आत्याची जमीन! सावकारी कर्जामुळे आत्महत्या करावी लागेल अशी भावनिक भीती घालून जमीन स्वत:च्याच नावे केली, जमिनीचे १८ लाख दिल्याचेही दाखविले

SCROLL FOR NEXT