mumbai sakal
मुंबई

मुंबई : घरावर पालिका कारवाई करणार या धास्तीने महिलेचा मृत्यू

पालिकेच्या या तोडक कारवाई विरोधात संताप ही व्यक्त होत आहे.

निसार अली

मालाड : आपल्या घरावर पालिका कारवाई करणार या धास्तीने मालतीन महादेव कोळी या वृद्ध महिलेचा हृदय विकाराने मृत्यू झाला आहे. कोळी या नवानगर, मढ कोळीवाडा येथील राहणार्या होत्या. त्यांनी नेटकेच आपल्या घराच्या पुनर्बांधनीचे काम हाती घेतले होते. त्यांना उशिरा रात्री पालिकेची घरावर तोडक कारवाईची माहिती मिळाली. त्या रडू लागल्या आणि त्यांना उद्या काय होईल याची भीती व धास्ती वाटू लागली आणि हृदय विकाराने मध्यरात्री त्यांचे 1.15 ला निधन झाले. त्यांच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. तसेच पालिकेच्या तोडक कारवाई विरोधात संताप ही व्यक्त होत आहे. (Mumbai News)

दरम्यान पालिकेच्या पथकाला कोळी समाजातील शेकडो महिलांच्या संतापाचा सामना करावा लागला. महिलांनी चक्का जाम केल्याने पालिकेला तात्पुरती कारवाई थांबवून परतावं लागलं तसेच मालवणी पोलिसांचा ही मोठा फौज फाटा तैनात होता.

संतोष कोळी ग्रामस्थ मढगाव शासन आमच्या कोळी वाड्यांचे प्रश्न का मार्गी लावत नाही तसेच आम्ही मुंबईचे मालक असून आमच्या घरांवर कारवाई आणि हजारो अनधिकृत बांधकामे मुंबईत आहेत या बद्दल पालिका व सरकारी धोरण काय व कसली कारवाई करणार? तसेच जर कारवाई करायची असेल तर आधी आमच्यावर लाठी चार्ज करा, की आम्हाला जेल मध्ये टाका आम्ही जिवंत आहोत तो पर्यंत कारवाई होऊ देणार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gokul Dudh Sangh : कोल्हापूर जिल्ह्याचे सहकार सत्ता केंद्र,‘गोकुळ’च्या निवडणुकीचे बिगुल पुढील आठवड्यात; अंतर्गत हालचालींना वेग

Mamata Banerjee: जिवंत लोक ‘मृत’ दाखवले? CJI सूर्यकांत यांच्यासमोर ममता बॅनर्जी आक्रमक; निवडणूक आयोगाला सुप्रीम कोर्टाची नोटीस

Gold Extraction from SIM Card : पठ्ठ्याने जुन्या सिमकार्डसमधून काढले २६ लाखांचे सोने, व्हिडिओ केला शेअर, लोक म्हणाले- हा तर आधुनिक किमयागार

''प्राची बॉस होती, निशिका-पाखी तिचं ऐकायच्या, रात्री २ वाजता त्यांनी...''; तीन बहिणींनी जीवन संपवल्याप्रकरणी वडिलांचा धक्कादायक खुलासा!

Latest Marathi News Live Update : काय पाणी मुरतय ते बघाव लागेल; अजितदादांच्या अपघात प्रकरणी गोगावलेंनी व्यक्त केला संशय

SCROLL FOR NEXT