doctor 
मुंबई

कोरोनाचा महिला डाॅक्टरांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर परिणाम; महिला डाॅक्टरनं पत्राद्वारे सांगितला अनुभव.. 

सकाळ वृत्तसेवा, सकाळवृत्तसेवा

मुंबई: कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून डाॅक्टर्स पीपीई किट्सचा वापर करत आहेत. मात्र, सतत कोविड वाॅर्डमध्ये आठ तासांहून अधिक काळ काम करणे शक्य नाही. याचा सर्वात जास्त त्रास महिला डाॅक्टरांना मासिक पाळी दरम्यान होत आहे. एकीकडे उपचार करताना होणारा शारिरीक त्रास तर, दुसरीकडे उपचार करत असल्यामुळे समाजातून मिळणारी चुकीची वागणूक अशा दुतर्फा समस्येतून महिला डाॅक्टर्स जात आहेत. 

पालिकेच्या केईएम रुग्णालयातील पॅथाॅलाॅजी विभागातील रेश्मा शिंदे या निवासी ज्युनियर डाॅक्टरने पीपीई किट्स घालून केलेल्या कामाचा आणि आपल्या लग्नाबाबतचा अनुभव डाॅक्टर दिनानिमित्त पत्राच्या माध्यमातून सोशल मिडियावर लिहिला आहे. 

आपण कोविड वाॅरियर्स म्हणून जरी काम करत असलो तरी आपल्यामुळे संसर्ग पसरू शकतो याची भीती कायम असते. समाजात कोरोनाची धास्ती मोठ्या प्रमाणात पसरली आहे. आमच्या कामामुळे कौतुकाचा वर्षाव जरी होत असला तरी पण, लग्न जुळवण्यातही खूप त्रास होत आहे. पण, ही वेळ या सर्वाचा विचार करत बसण्याचा नाही. मात्र, कोरोना या शब्दाची ही 
खूप मोठी भीती लोकांमध्ये आहे. या सर्व मानसिक त्रासामुळे कधी कधी मनावर परिणाम होतो आणि भीती वाटते की लग्नाचं स्वप्न तुटेल. या सर्व भावना डाॅ. रेश्मा शिंदे यांनी त्यांच्या पत्रात मांडल्या आहेत. 

पीपीई किट्स आणि मासिक पाळी:

पीपीई किट्स घातल्यानंतर मासिक पाळी आली की ते कीट वाया जाईल या भीतीने अनेक महिला डाॅक्टर्स त्याच अवस्थेत राहतात. ड्युटी संपून वाॅर्डमधून बाहेर पडल्यानंतर किट्सची विल्हेवाट योग्य पद्धतीने होत नाही तोपर्यंत तिथून हलताही येत नाही. ज्या माता कोरोना वाॅरियर्स आहेत त्यांना सर्वात जास्त त्रास सहन करावा लागत आहे. मासिक पाळी दरम्यान डिहायड्रेशनची समस्या खूप तीव्र जाणवते. कारण, सतत 6 तास पीपीई कीट्स घालून काम करत असताना पाणी पिता येत नाही आणि नैसर्गिक विधी करता येत नाही. त्यामुळे ही समस्या फारच गंभीर झाली आहे. 

सेव्हन हिल रुग्णालयातील 28 वर्षीय महिला निवासी डॉक्टरला ही असाच अनुभव आला आहे. एप्रिलमध्ये ठरलेलं लग्न मे महिन्यात तुटल्याचा अनुभव त्यांनी सांगितला.

woman doctor tell her experience in corona  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ED Action against Anil Ambani : अनिल अंबानींवर ‘ED’ची मोठी कारवाई!, मुंबईतील अलीशान घर तात्पुरते जप्त

PCMC News : ‘स्थायी’च्या अध्यक्षपदासाठी अभिषेक बारणेंना संधी; एकमेव अर्ज दाखल; बिनविरोध निवड निश्चित, शनिवारी होणार शिक्कामोर्तब

Lung cancer in Mumbai : मुंबईत फुफ्फुसांच्या कर्करोगाच्या ५७ टक्के रुग्णांमध्ये प्रदूषण हेच प्रमुख कारण!

SL vs NZ, T20 WC: न्यूझीलंडची उपांत्य फेरीच्या दिशेने वाटचाल! श्रीलंकेचे आव्हान संपुष्टात, जाता जाता पाकिस्तानची लावली वाट

Bride shot at wedding ceremony Video : विवाहमंडपात थरार! नववधूवर माथेफिरू प्रियकरानं सर्वांसमोरच झाडली गोळी

SCROLL FOR NEXT