ठाणे जिल्हा परिषदेवर येणार महिला राज; आरक्षण सोडत जाहीर 
मुंबई

ठाणे जिल्हा परिषदेवर येणार महिला राज; आरक्षण सोडत जाहीर

सकाळ वृत्तसेवा

ठाणे : ठाणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासह पाच पंचायत समितींच्या सभापती पदाचा अडीच वर्षाचा कार्यकाल जुलै महिन्यात संपुष्टात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर गुरुवारी आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली. यामध्ये ठाणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासह शहापूर, कल्याण आणि अंबरनाथ या तीन पंचायत समिती सभापती पदांवर महिला आरक्षण पडले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा जिल्हा परिषदेसह पंचायत समितीवर महिला राज दिसून येणार आहे. 

गुरुवारी ए. न. के. टी. महाविद्यालयाच्या सभागृहात आरक्षण सोडत कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) अभिजित भांडे-पाटील, तहसीलदार (सा.प्र) राजराम तवटे आणि आमदार शांताराम मोरे यांच्या उपस्थितीत या पदांसाठीचा आरक्षण सोडत झाली. यावेळी ठाणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदासाठी नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) आरक्षण जाहीर झाले असून शहापूर पंचायत समिती सभापती पदासाठी अनुसूचित जमाती (महिला), अंबरनाथ पंचायत समिती सभापती पदासाठी अनुसूचित जमाती (महिला), पंचायत समिती मुरबाड सभापती पदासाठी नागरिकांचा मागास प्रवर्ग, पंचायत समिती कल्याण सभापती पदासाठी सर्वसाधारण महिला आणि पंचायत समिती भिवंडी सभापती पदासाठी सर्वसाधारण असे आरक्षण जाहीर करण्यात आले.

दरम्यान, राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीमध्ये मर्यादित स्वरुपात आरक्षण सोडत कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, आरक्षण सोडत कार्यक्रम शासन निर्देशानुसार मर्यादित प्रतिनिधींच्या उपस्थितीत व सॅनिटायझर, सोशल डीस्टन्स या नियमाचे पालन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Drought Fodder Camp : चारा छावणीसाठी शासनाचे नियम काय? किती अनुदान मिळते; जिल्हाधिकाऱ्यांना महत्त्वाचे अधिकार

Maratha Reservation : मागण्या मान्य नाही झाल्या तर पाटोद्यावरून मुंबईकडे कूच; मनोज जरांगेंचा सरकारला पुन्हा इशारा, शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफीचीही केली मागणी

Malshej Ghat Accident: माळशेज घाटात एसटी बस-आयशर टेम्पोची धडक; वाहतूक कोंडी

Maharashtra Drought Trigger 1 : ट्रिगर-१ म्हणजे काय? शेतकऱ्यांना कोणत्या सवलती मिळणार?; विविध सवलतींचा मार्ग मोकळा

Latest Marathi News Live Update : दुष्काळसदृश परिस्थितीने सोयाबीन पिकाला फटका; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडून मरडसगावात पिकांची पाहणी

SCROLL FOR NEXT