trupti desai 
मुंबई

आपल्या राज्यात चाललय काय? साकीनाका घटनेवर तृप्ती देसाईंची संतप्त भावना

"राज्य सरकार थापा मारतय. आम्ही शक्ती कायदा आणणार. कुठे गेला शक्ती कायदा?"

दीनानाथ परब

मुंबई: साकीनाका बलात्कार प्रकरणावर (sakinaka rape case) तृप्ती देसाई (trupti desai) यांनी संतप्त भावना व्यक्त केल्या आहेत. महिलांचे हक्क, अधिकारांसाठी आवाज उठवण्यासाठी तृप्ती देसाई ओळखल्या जातात. "साकीनाका येथे महिलेवर बलात्कार करुन, तिच्या गुप्तांगाला जख्मी करण्यात आलं. त्या निर्भयाची मृत्यूशी सुरु असलेली झुंज अपयशी ठरली आहे" असे तृप्ती देसाई म्हणाल्या.

"आपल्या राज्यात चाललय काय? कायदा-सुव्यवस्था आहे की नाही? महिला असुरक्षित आहेत. पुण्यात बलात्कार झाला. अनेक प्रकरण घडली" अशी टीका तृप्ती देसाई यांनी केली. "आरोपीला अटक झाली. परंतु आरोपीला सहा महिन्याच्या आत फासावर लटकवा. तर खऱ्या अर्थाने न्याय मिळेल" असे त्या म्हणाल्या.

"आपल्याकडे जलदगती न्यायालय आहे. पॉस्को कायदा आहे. तरी आरोपीला तातडीने फाशी देत नाही" अशी खंत त्यांनी व्यक्त केली. "राज्य सरकार थापा मारतय. आम्ही शक्ती कायदा आणणार. कुठे गेला शक्ती कायदा?" असा सवाल त्यांनी विचारला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jawali Politics:'आमदार शशिकांत शिंदे यांना जावळीमध्ये धक्का'; बाजार समितीचे उपसभापती हेमंत शिंदेंचा भाजपमध्ये प्रवेश, भाजपची ताकद वाढणार

‘यूपीआय’ व्यवहारांत मोठा बदल

Maratha Reservation : ओबीसी, मराठा आरक्षणावर सरकार ठाम : महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

‘जीएसटी-२’ जय हो!

प्राप्तिकर कायदा आणि समाज माध्यमे

SCROLL FOR NEXT