नवी मुंबईचा कारभार महिला महापौर सांभाळणार
नवी मुंबईचा कारभार महिला महापौर सांभाळणार  
मुंबई

नवी मुंबईचा कारभार महिला महापौर सांभाळणार

सकाळ वृत्तसेवा

नवी मुंबई : २०२० मध्ये होणाऱ्या महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर महापालिका महापौरपदी महिला विराजमान होणार आहे. बुधवारी दुपारी झालेल्या आरक्षण सोडतीत नवी मुंबई महापालिकेच्या महापौरपदाची जागा खुल्या वर्गातील महिलेसाठी जाहीर करण्यात आली. त्यामुळे २०१० नंतर आता पुन्हा नवी मुंबई शहराची धुरा महिला महापौर सांभाळणार आहे. 

महापौर म्हणून महिला सदस्याचा कारभार नवी मुंबईकरांना तसा काही नवीन राहिलेला नाही. मात्र, ही संधी अनेक वर्षांनी आल्यामुळे महापौरपदासाठी उताविळ असलेल्या पुरुष नगरसेवकांची निराशा झाली आहे. यापूर्वी नवी मुंबई महापालिकेची स्थापना झाल्यानंतर शिवसेनेच्या नगरसेविका सुषमा दंडे या १९९६ ला पहिल्या महिला महापौर झाल्या होत्या; परंतु तेव्हा राज्यभरात महापौर पदाचा कार्यकाळ हा एक वर्षाचा असल्यामुळे दंडे यांना १९९७ पर्यंतच कारभार हाकता आला. त्यानंतर नागरी विकास आघाडीच्या विजया म्हात्रे यांनी १९९८-९९ या काळात महापौरपदाचा कार्यकाळ अनुभवला. त्यानंतर महापौरपदाचा कार्यकाळ पाच वर्षांचा केल्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून निवडून गेलेल्या नगरसेविका मनीषा भोईर या २००५ ते २००७ या काळापर्यंत महापौर झाल्या. अंजनी भोईर यांनी उरलेली अडीच वर्ष महापौर म्हणून २००७ ते २०१० पर्यंत कारभार केला. सध्या महापालिकेच्या १११ प्रभागांपैकी ५६ नगरसेविका आहेत. पुरुषांच्या तुलनेत महिलांची ताकद जास्त असतानाही या महापालिकेच्या सभागृहात अनेकदा महिला सदस्यांना बोलताना तोंड आवरते घ्यावे लागत होते. मात्र, आता कारभार चालवणारी महिला महापौरपदावर विराजमान होणार असल्याने महापालिकेच्या सभागृहात नारीशक्ती अधिक बळकट झालेली पाहायला मिळू शकते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal: नायब राज्यपालांकडून केजरीवाल पुन्हा टार्गेट! खलिस्तान्यांकडून पैसा घेतल्याची केली NIAकडं तक्रार

Team India Jersey: T20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया दिसणार नव्या रुपात, नवी जर्सी झाली लाँच; पाहा Video

IPL 2024 MI vs SRH Live Score: हार्दिक-चावलाने पाडलेलं हैदराबादच्या फलंदाजीला खिंडार, पण कॅप्टन कमिन्स फटकेबाजीने मुंबईसमोर 174 धावांचं लक्ष्य

Hires Women to Seduce Men: पबमध्ये पुरुषांना भुरळ घालण्यासाठी महिलांची नियुक्ती; पोलिसांच्या छाप्यात धक्कादायक प्रकार उघड

Sunita Williams News : अभिमानास्पद! सुनीता विल्यम्स पुन्हा घेणार अंतराळात झेप; सोबत नेणार भगवद्‍गीता अन् 'ही' खास मूर्ती

SCROLL FOR NEXT