मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीएच्या) विविध पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांवरील सुमारे तीन चतुर्थाश मजुरांनी काम सोडून मूळ गावी जाण्यास सुरुवात केली आहे. तरीही अंधेरी ते दहिसर (मेट्रो 7) आणि दहिसर ते डी. एन. नगर (मेट्रो 2 A) या दोन्ही मार्गांवरील मेट्रोचे काम वेगाने सुरु आहे.
मेट्रो प्रकल्प 2 A (18.60 किमी) आणि मार्ग 7 (16.47 किमी) या दोन्ही मार्गिका डिसेंबर 2020 पर्यंत सुरू करण्याचे नियोजन होते. मात्र कोरोनाच्या संकटामुळे तो मुहूर्त किमान तीन ते सहा महिने लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. मात्र, या मार्गांवर मेट्रो सुरू झाल्यानंतर त्यांचे संचलन आणि अन्य कामांची पूर्वतयारी एमएमआरडीएने सुरू केली असून या मार्गिकांवर 30 स्टेशन आहेत.
आतापर्यंत मेट्रो 2 A च्या मार्गिकेवरील पायाभूत कामे पूर्ण करण्यात आली आहे. यामध्ये पियर आणि स्लॅबचे काम पूर्ण झाले आहे. तर मेट्रो 7 वरील प्लॅटफॉर्मसाठी पियर कॅप बसविण्याचे काम सुरु आहे . तर नॅशनल पार्क मेट्रो स्थानकाजवळ वीज पुरवठा करणारी यंत्रणा दाखल करण्यात आली आली. हे प्रकल्प वेळेमध्ये पूर्ण करण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून एमएमआरडीएने या कामांना वेग दिला आहे.
दरम्यान मेट्रो मार्गिकांचे काम रखडल्याने या प्रकल्पांच्या खर्चामध्ये वाढ होणार असून प्रकल्पाचा कालावधी वाढणार आहे. हा कालावधी जास्त वाढू नये आणि प्रकल्पांच्या खर्चामध्येही वाढ होऊ नये म्हणून एमएमआरडीए आता जोमाने कामाला लागली आहे़ असे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे .
work of metro 2 a and metro 7 is going on without other state workers
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.